विराट धोनी आमने-सामने, परंतु फुटबॉल सामन्यासाठी !

डांबूला: भारत विरुद्ध श्रीलंका ५ सामन्यांच्या वन-डे मालिकेला आज येथे सुरुवात होत आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील भारत आणि आठव्या स्थानावरील श्रीलंका हे दोन संघ ही मालिका जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील.

कोणतीही मालिका म्हटलं किंवा सामना म्हटलं की सराव हा आलाच. आजकाल अनेकवेळा आपण भारतीय संघ सामन्यापूर्वी फुटबॉल खेळताना पहिला आहे. मग आजचा सामना तरी याला कसा अपवाद असेल. काल भारतीय संघाने येथे फुटबॉलचा सामना खेळला.

या सामन्यात तीन संघ करण्यात आले होते. विराट कोहली, एमएस धोनी आणि केएल राहुल असे तिघांचे संघ होते. रोहीत शर्मा, फिरकीपटू यजुवेंद्र चहल, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार या खेळाडूंनी यात भाग घेतला होता. याबाबद्दलचा अधिकृत फोटो बीसीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

भारताला आपले आयसीसी क्रमवारीतील तिसरे स्थान कायम ठेवण्यासाठी मालिका कमीतकमी ४-१ अशी तर लंकेला २०१९च्या विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी मालिकेत कमीतकमी २ सामने जिंकावे लागणार आहे.

यातून निवडला जाणार भारतीय संघ:

विराट कोहली ( कर्णधार ), शिखर धवन, रोहीत शर्मा ( उप-कर्णधार ), लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी ( यष्टीरक्षक ), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर

वेळ: भारतीय वेळेनुसार आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी , ठिकाण: रंगिरी डांबूला आंतरराष्ट्रीय स्टेडियम