संपुर्ण यादी- भारताचे हे स्टार आजपर्यंत खेळले आहेत काऊंटी क्रिकेट

मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सरे या इंग्लडमधील काऊंटी संघाने जुन महिन्यासाठी करारबद्ध केले.

गेल्या इंग्लंड दौऱ्यात अपयश आल्यामुळे हा खेळाडू सध्या काऊंटी खेळण्याला प्राधान्य देणार आहे. ज्याचा उपयोग त्याला निश्चित आगामी दौऱ्यात होणार आहे.

कोहलीच्या सरेकडून खेळण्याची जोरदार चर्चा सध्या भारतात होत आहे. भारताचा एवढा मोठा स्टार आणि व्यस्त खेळाडू काऊंटी खेळत असल्यामुळे भारताप्रमाणेच याची इंग्लंडसह क्रिकेट विश्वात मोठी चर्चा आहे.

त्यामुळे सहाजिकच यापुर्वी कोणत्या भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला याची चर्चाही होऊ लागली आहे.

आजपर्यंत काऊंटी क्रिकेट खेळलेले भारतीय खेळाडू-

नवाब पतौडी सिनियर, अब्दुल हफिज कर्दार, नवाब पतौडी ज्युनियर, अब्बास अली बेग, फारुक इंजिनिअर,बिशनसिंग बेदी, एस, राघवन, दिलीप दोशी, सुनिल गावसकर,कपील देव,  रवी शास्त्री, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, जवागल श्रिनाथ, अनिल कुंबळे, मनोज प्रभाकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, मोहम्मद कैफ, युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग, अजित आगरकर, दिनेश मोंगिया, झहीर खान, इरफान पठाण, मुरली कार्तिक, हरभजन सिंग, आरपी सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, एस श्रिशांत, पियुष चावला, प्रग्यान ओझा, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, वरुन अॅराॅन, इशांत शर्मा, आर अश्विन.

या स्पर्धेत खेळलेल्या भारतीय खेळाडुंचे काही विक्रम-

-काऊंटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूमध्ये सर्वाधिक सामने हे फारुक इंजिनीअर यांनी खेळले आहेत. त्यांनी लॅंकशायरकडून १६४ सामने खेळले आहेत. १०० सामने खेळणारे बिशनसिंग बेदी (१०२) हे केवळ दुसरे भारतीय खेळाडू.

-आरपी सिंग हा लिस्टेशायरकडून केवळ २ सामने २००७ साली खेळला आहे.

-नवाब पतौडी तब्बल १३ वर्ष ससेक्सकडून  काऊंटी क्रिकेट खेळले. यात त्यांनी ८२ सामने खेळले.

-काऊंटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूमध्ये सर्वाधिक शतके ही मोहम्मद अझरुद्दीनने केली आहेत. त्याने ८ शतके डर्बीशायरकडून केली आहेत. तर दुसऱ्या स्थानावर ६ शतकांसह रवी शास्त्री आणि सिनीयर नवाब पतौडी आहेत.

-काऊंटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूमध्ये सर्वाधिक धावा फारुक इंजिनीअर यांनी केल्या आहेत. त्यांनी १६४ सामन्यात ५५४९ धावा केल्या आहेत. ३२९६ धावांसह रवी शास्त्री दुसऱ्या स्थानी आहेत.

-काऊंटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूमध्ये सर्वाधिक वेळा फारुक इंजिनीअर(३६) नाबाद राहिले आहेत.

-व्हीव्हीएस लक्ष्मणची भारतीय खेळाडूमध्ये सरासरी ही सर्वात जास्त आहे. त्याने ६१.८५च्या सरासरीने १६ सामन्यात १२३७ धावा केल्या आहेत.

-नाबाद २३१ धावा  या एका डावातील भारतीय खेळाडूने केलेल्या वैयक्तिक सर्वोच्च धावा आहेत. सिनीयर नवाब पतौडी यांनी या धावा केल्या आहेत. मोहम्मद आझरुद्दीन हा केवळ दुसरा भारतीय आहे ज्याने या स्पर्धेत द्विशतक केले आहे.

-मुरली कार्तिकने ४ संघांकडून काऊंटी क्रिकेट खेळले आहे. त्याने मिडलसेक्स, लॅंकशायर, सोमरसेट आणि सरेकडून या स्पर्धेत भाग घेतला आहे.

-बिशनसिंग बेदीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. १०२ सामन्यात त्यांनी ३९४ विकेट्स घेतल्या आहेत. २०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये दिलीप दोशी (२४६) आणि मुरली कार्तिक (२२०) यांचा समावेश आहे.

-तब्बल २३ वेळा बिशनसिंग बेदींनी ५ विकेट्स घेतल्या आहेत.

-एका डावात ७६ धावा देत ९ विकेट्स घेण्याचा पराक्रम जवागल श्रीनाथने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
Video- ओवरमध्ये जिंकायला हव्या होत्या ५ धावा, घडले असे काही की…