भारतीय क्रिकेटपटू विरुद्ध बॉलीवूड संघात रंगणार फुटबॉल सामना 

मुंबई। अंधेरी स्पोर्ट्स कॉम्पलेक्स येथे १५ ऑक्टोबर, रविवारी मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना होणार आहे. हा सामना भारतीय क्रिकेटपटू विरुद्ध बॉलीवूडचे कलाकार असा होणार आहे.

भारतीय क्रिकेटपटूच्या संघाचे नाव ऑल हार्ट्स एफसी असे असून विराट कोहली या संघाचा कर्णधार असणार आहे. बॉलीवूड संघाचे नाव ऑल स्टार्स एफसी असून रणबीर कपूर या संघाचे नेतृत्व करणार आहे.

या सामन्यासाठी विराट आणि अभिषेक बच्चन यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या चॅरिटीसाठी हा सामना खेळवला जाईल. या सामन्याबद्दलची माहिती विराट कोहली आणि अजिंक्य राहणेने त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून दिली आहे.

विराटने या सामन्याच्या तयारीबद्दल सांगितले की “एम.एस. धोनी या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे. त्याने तर या मॅचसाठीच्या योजना तयार करायला सुरुवात केली आहे, कारण आम्ही मोठ्या स्थरावर फुटबॉल खेळत नाही”

मागील वर्षीही असाच एक सामना खेळला गेला होता. ज्यात विराटचा संघ विरुद्ध अभिषेक बच्चनच्या संघाबरोबर खेळला होता. हा सामना २-२ ने बरोबरीत सुटला होता.

विराट कोहली हा इंडियन सुपर लीग स्पर्धेतील एफसी गोवा संघाचा सहसंघमालकही आहे.