केएल राहुलच्या त्या कॅचवर प्रश्न उपस्थित केल्याने टीम इंडियाचे चाहते भडकले

भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटीत 31 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पण भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका म्हटले की वाद हे समीकरण चाहत्यांसाठी नवीन नाही. त्यामुळे यावेळीही फॉक्स क्रिकेटने असाच एक वाद तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्य़ा दिवशी केएल राहुलने घेतलेल्या विजयी झेलवर प्रश्न उपस्थित केला आहे.

या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात  आर अश्विन गोलंदाजी करत असताना120 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जोश हेजलवूडने फटका मारला. पण तो चेंडू सरळ गुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या केएल राहुलच्या दिशेने गेला आणि तो चेंडू मैदानाच्या थोडा वर असताना राहुलने झेलला. ही आॅस्ट्रेलियाची शेवटची विकेट असल्याने भारताने हा सामना जिंकला.

त्यावेळी कोणीही त्या झेलवर प्रश्न उपस्थित केले नव्हते. तसेच हेजलवूडला बाद देण्याआधी पंच निगल लाँग यांनीही खात्री करुन घेतली होती.

पण त्यानंतर फॉक्स क्रिकेटने या झेलचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करुन त्यावर तो झेल अचूक होता का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र चाहत्यांना हा प्रश्न पटला नसल्याने त्यांनी या प्रश्नावर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

वेगवान गोलंदाजांना विश्रांती मिळावी म्हणुन विराटने काय केले पहाच

दुसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी पृथ्वी शाॅच्या सहभागाबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी

चार तासात विराट-अनुष्काच्या त्या फोटोला मिळाल्या तब्बल 22 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स