भारतीय फुटबॉलला येणार चांगले दिवस ..??

भारत, ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या फिफाच्या अंडर १७ विश्वचषकाचा आयोजक आहे. भारत फिफाच्या सारख्या मोठया स्पर्धेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आणि स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ. १९५० मध्ये ब्राझील येथे झालेल्या फिफाच्या विश्वचषकासाठी भारत पात्र ठरला होता पण काही आर्थिक कारणांमुळे भारतीय संघाने माघार घेतली. फिफाच्या समितीने बुटांशिवाय खेळण्यास मनाई केल्यानंतर भारतीय संघाने माघर घेतली. फिफाच्या स्पर्धेत आर्थिक कारणांमुळे माघार घेणारा भारत आज त्यांच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत आहे.

 
भारतीय संघ आयोजक असल्यामुळे भारत थेट या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. भारतीय संघ पात्रता फेरीचे सामने खेळून पुढे जाऊ शकला असता की नाही याची फ़ुटबाँल विश्वात उलट सुलट चर्चा जरी होत असली तरी भारतीय संघाची लय पाहता आवाक्यात होते.

 
लुई नॉर्टन डी मॅटोस हे भारतीय संघाचे सध्याचे कोच आहेत. भारतीय संघ विश्वचषकात चांगली कामगिरी करावी या हेतूने सकारात्मक पाऊले उचलत असून संघ यूरोपीय दौऱ्यावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार हा सुरेश सिंग वंगज्म हा मँचेस्टर युनाइटेड कप मधील खेळाडू आहे. लियोनाल मेस्सी, इनिएस्टा, झेवियर हर्नानडेझ, टॉरेस हे खेळाडू या स्पर्धेशी जोडले गेले होते. भारतीय संघ पोर्तोगाल दौरा संपवून आता फ्रान्स मध्ये जाईल पण काल भारतीय संघाने इटलीच्या संघाला २-० ने हरवत प्रगती करत आहोत हे दाखवून दिले. भारतीय संघ आता एक सामना पोर्तोगलच्या संघासोबत खेळेल आणि त्यानंतर ते फ्रान्स मधील एक मोठा संघ असणारा पॅरिस सेंट जर्मन या संघाशी दोन हात करेल.

 
जगभरातील मोठे संघ भारतात येणार आणि आपणाला त्यांचे पददालित्य पाहावयास मिळणार ही खूप मोठी गोष्ट आहे. मेस्सी, नेमार, टोनी क्रॉस प्रथम आपले कौशल्य यांनी अंडर १७ मधेच दाखवली आणि जग यांना ओळखू लागले. कदाचित काही भारतीय खेळाडूंचा खेळ अश्या उंचीवर जाईल की त्यांना एखाद्या मोठया क्लब कडून खेळण्याची संधी मिळेल. सर्व वलय त्याच्या भोवती फिरेल आणि भारतीय फुटबॉलला नवा चेहरा मिळेल.