कोहलीला भेटायच स्वप्न भंगल, विजय मल्ल्याचा या कारणामुळे झाला हिरमोड

भारतीय बॅंकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडला फरार झालेल्या विजय माल्याने, भारत सरकारकडे विराट कोहली आणि भारतीय संघाला भेटण्याची विनंती केली होती.

सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या भारतीय संघ बर्मिंघहॅमच्या एजबेस्टन मैदानावर पहिला कसोटी सामना खेळत आहे.

मात्र भारत सरकारने विजय माल्याची ही विनंती फेटाळून लावली आहे.

विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाचा सदस्य आहे.

2008 ते 2016 पर्यंत विजय माल्या  रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा संघाचा चेअरमन होता. मात्र भारत सोडून गेल्याने त्याला हे पद सोडावे लागले होते.

या इग्लंड दौऱ्यातील टी-20 मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला होता तर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने भारतावर 2-1 विजय मिळवला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा

टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम