भारतीय आईस हॉकी संघाने गुरुवारी घडविला इतिहास…

0 72

भारतीय आईस हॉकी संघाने गुरुवारी घडविला इतिहास. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलावहीला विजय मिळवताना भारतीय संघाने फिलिपिन्स संघाचा ४-३ असा पराभव केला.
सध्या बॅंकॉक येथे सुरु असलेल्या आशियायी चॅलेंज कप मध्ये ही लढत झाली. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारताने १-० अशी बढत घेतली होती. भारताला तिसऱ्या सत्रात एकही गोल करता आला नाही. परंतु शेवटच्या सत्रात दोन्ही बाजूंनी सर्वोच्च खेळाचं प्रदर्शन झालं. आक्रमक खेळ खेळताना दोन्ही बाजूंनी गोल झाले. परंतु भारताने बाजी पलटवत सामना ४-३ असा खिशात घातला.

भारताला हा विजय खूप गरजेचा होता. कारण भारतात ह्या खेळाबद्दल जास्त माहिती नाही. जवळजवळ ३००० दानकर्त्यांनी दिलेल्या निधीमधून भारतीय संघ या मालिकेसाठी जाऊ शकला. तसेच त्याच पैश्यातून भारतीय संघाचं राहण्याचा, जर्सीचा, जाण्याचा तसेच व्हिसाचा खर्च भागवला.

Comments
Loading...
%d bloggers like this: