राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: ‘चक दे इंडिया’, मलेशियावर मात करत भारत उपांत्य फेरीत!

गोल्ड कोस्ट | राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या हॉकी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने मलेशियाला २-१ने पराभूत केले.

भारताच्या हरमनप्रीतनं तिसऱ्या मिनिटात गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही. १६व्या मिनिटाला मलेशीयाच्या फैजल सारीने गोल करून बरोबरी साधली.

हाफ टाईमनंतर भारताच्या हरमनप्रीतनं पुन्हा एकदा गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.

ती आघाडी भारताने शेवटपर्यंत राखून ठेवली आणि मलेशियावर २-१ ने विजय मिळवला. या विजयामुळे भारत आता ‘ब’ गटात पहिल्या क्रमांकावर आहे.

याबरोबर भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.