भारतीय पुरुष कबड्डी संघाचा तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश, जाणून घ्या तिसऱ्या दिवसाचे पुरुष विभागाचे निकाल

-अनिल भोईर

‘अ’ गटात कोरियाकडून झालेल्या पराभवानंतर आज भारतीय संघ शेवटचा साखळी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. पहिल्याच रेडमध्ये कर्णधार अजय ठाकूरची पकड झाली. त्यानंतर रिशांक देवडिगा व प्रदीप नरवालने झटापट चढाई करत गुण मिळवत भारताची आघाडी वाढवली.

मध्यंतरापर्यत भारत आपली आघाडी वाढवणार असे वाटत असताना भारतीय खेळाडू एकापाठोपाठ बाद होत केले. मध्यंतराला भारताकडे २१-१२ अशी आघाडी होती.

मध्यंतरानंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. राहुल चौधरी व प्रदीप नरवालने १-१ सुपररेड केली. तर संदीप नरवाल व मोहित चिल्लारने चांगल्या पकडी केल्या. थायलंडचा ४९-३० असा पराभव करत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

‘अ’ गटात झालेला बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना चुरशीचा झाला, बांगलादेशने श्रीलंकेचा २९-२५ असा पराभव केला. ‘ब’ गटात जपानने ३१-२८ असा नेपाळ विरुद्ध विजय मिळवला. तर इराणने ५८-२४ असा सहज मलेशियाचा पराभव केला.

आशियाई क्रीडा स्पर्धा (२१ ऑगस्ट)
पुरुष कबड्डी स्पर्धेचे सर्व निकाल:

१) इंडोनेशिया ३० विरुद्ध मलेशिया २२
२) बांगलादेश २९ विरुद्ध श्रीलंका २५
३) जपान ३१ विरुद्ध नेपाळ २८
४) भारत ४९ विरुद्ध थायलंड ३०
५) इराण ५८ विरुद्ध मलेशिया २४
६) इंडोनेशिया ११ विरुद्ध पाकिस्तान ४०

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?

केवळ ६ धावा आणि क्रिकेट जगतातील सर्वात खास विक्रम कोहलीच्या नावे

लारा, ब्रॅडमन, पाॅटींग… सर्वांचे विक्रम किंग कोहलीने मोडले