एशियन गेम्स कबड्डीत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा निराशाजनक पराभव

– अनिल भोईर

आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा कोरिया कडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा हा तिसरा पराभव ठरला.

पहिल्या दिवशी दोन सामने जिंकून भारतीय संघाने स्पर्धेत जोरदार सुरवात केली होती. आज कोरिया विरुद्ध विजय मिळवून भारतीय संघ विजयाची हॅट्रिक साधणार असे वाटत होते. पण सुरुवातीपासून कोरियाने आक्रमक खेळ करत मध्यंतरापर्यत १४-११ अशी आघाडी घेतली.

मध्यंतरानंतर भारतीय संघला कोरियाने पुन्हा कडवी झुंज देत आपली आघाडी कायम ठेवली. एकावेळ सामना १७-१७ असा बरोबरीत असताना भारताकडून वारंवार चुका झाल्या, पण कोरियाने चांगला खेळ करत शेवटी भारताचा १ गुणांच्या फरकाने पराभव केला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा हा तिसरा पराभव ठरला. तर कोरियाकडून दुसऱ्यांदा पराभव झाला.

त्यापूर्वी झालेल्या बांगलादेश विरुद्ध थायलंड सामना बांगलादेशने ३४-२२ असा जिंकला. जपानने ३०-२० असा मलेशियाचा पराभव केला.

इराण विरुद्ध पाकिस्तान सामन्यात इराणने ३६-२० असा सामना जिंकत दुसरा विजय नोंदवला. श्रीलंकाने थायलंडचा ४६-२९ असा पराभव केला.

भारतीय पुढील सामना २१ ऑगस्ट रोजी थायलंड विरुद्ध होणार असून भारतीय संघ यासामन्यात जोरदार वापसी करेल अशी आशा आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा (२० ऑगस्ट)
पुरुष कबड्डी स्पर्धेचे सर्व निकाल:

१) बांगलादेश ३४ विरुद्ध थायलंड २२
२) जपान ३० विरुद्ध मलेशिया २०
३) भारत २३ विरुद्ध कोरिया २४
४) पाकिस्तान २० विरुद्ध इराण ३६
५) श्रीलंका ४६ विरुद्ध थायलंड २९
६) इंडोनेशिया ३४ विरुद्ध जपान २६

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक

एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक