एशियन गेम्स: भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरूच, हॉंग कॉंगवर मिळवला २६-०ने विजय

जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय हॉकी संघाने हॉंग कॉंगचा २६-० असा पराभव केला. भारतीय संघाचा हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. याआधी त्यांनी १९३२ला लॉस एंजेल्समध्ये अमेरिकेवर २४-१ असा विजय मिळवला होता.

तसेच हॉंग कॉंग विरुद्धच्या या सामन्यात भारताकडून आकाशदिप, रुपिंदर, ललित आणि हरमनप्रीत या हॉकीपटूंनी हॅट्ट्रीक केली. तर मनप्रीत, सुनिल, मनदिप यांनी प्रत्येकी दोन आणि  विवेक, अमित, वरूण, दिलप्रीत, सिमरनजीत, सुरिंदर, चिंग्लेसाना यांनी प्रत्येकी एक गोल केले.

भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात यजमान इंडोनेशियाला १७-०ने पराभूत केले होते. यावेळी दिलप्रीत, सिमरनजीत आणि मनदिप सिंग या तिघांनी हॅट्ट्रीक केली होती. आकाशदिप आणि रुपिंदर यांनी प्रत्येकी दोन गोल केले. तर एस व्ही सुनिल, विवेक सागर, हरमनप्रीत आणि अमित यांनी प्रत्येकी यांनी प्रत्येकी एक गोल केले.

जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानावर असणाऱ्या भारताने सलग दुसऱ्यांदा एशियन गेमचे विजेतेपद मिळण्यास विजयी वाटचाल सुरू ठेवली आहे. जर भारताने यामध्ये सुवर्णपदक जिंकले तर ते सरळ २०२०च्या टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरतील.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: १६वर्षाच्या सौरभने पराभूत केले विश्वचॅम्पियन आणि ऑलिंपिक विजेत्यांना

एशियन गेम्स: महाराष्ट्र कन्या राही सरनोबतचा सुवर्णवेध