भारतीय फुटबॉल संघाची गेल्या २० वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रमवारी

फिफाने काल जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघाने ९६ वे स्थान मिळविले आहे. भारतीय फुटबॉल संघाची ही गेल्या २० वर्षातील सर्वोत्तम क्रमवारी आहे.

ताज्या क्रमवारीनुसार भारतीय संघाचा आशियात १२ वा क्रमांक आहे. आशियायी देशांत इराणचा फुटबॉल संघ अव्वल स्थानावर आहे.

यापूर्वी १९९३ साली भारतीय संघाने ९४व्या स्थानी झेप घेतली होती. भारतीय संघ २०१५ मध्ये १७१व्या स्थानी होता. परंतु योग्य कामगिरी आणि प्रशिक्षक यांच्या जोरावर भारतीय संघ इथपर्यंत पोहचला आहे.

भारतीय संघाच्या महत्त्वाच्या क्रमवारी आणि वर्ष
क्रमवारी- ९४, वर्ष-१९९६
क्रमवारी- ९६, वर्ष- २०१७
क्रमवारी- ९९, वर्ष- १९९३
क्रमवारी- १७१, वर्ष- २०१५
भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव