एकवेळच्या धोनीच्या सर्वात आवडत्या गोलंदाजाने केले क्रिकेटला अलविदा

भारताचा वेगवान गोलंदाज मनप्रीत गोणीने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्याने निवृत्ती घेत असल्याचे पत्र पंजाब क्रिकेट असोसिएशनला पाठवले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत देशांतर्गत क्रिकेट, टी20 आणि आंतरराष्ट्रीय सामने मिळून 206 सामने खेळले असून 369 विकेट्स घेतल्या आहेत.

गोणीने 2007 मध्ये पंजाबकडून आंध्रप्रदेश विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर वर्षभरातच त्याने पाकिस्तानमध्ये झालेल्या 2008 च्या आशिया चषकातून भारताकडून हाँग काँग विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

या स्पर्धेत त्याने बांगलादेश विरुद्धही सामना खेळला. पण या दोन सामन्यानंतर मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने या दोन सामन्यात मिळून दोन विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर गोणीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना एकूण 44 सामन्यात 37 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने शेवटचे स्पर्धात्मक क्रिकेट यावर्षी सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये खेळले आहे. त्याने या स्पर्धेत 5 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

गोणीने ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्ती घोषित केली असल्याची चर्चा आहे. त्याला या लीगमध्ये टोरोंटो नॅशनल्स संघाने या स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमासाठी संघात सामील केले आहे.

काही दिवसांपूर्वी भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगनेही परदेशी लीग खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि बीसीसीआयच्या अंतर्गत असणाऱ्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तोही यावर्षी 25 जूलैपासून सुरु होणाऱ्या ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये टोरोंटो नॅशनल्स संघाकडून खेळणार आहे.

बीसीसीआयची त्यांच्या अंतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना परदेशी क्रिकेट लीग खेळण्यासाठी परवानगी नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या खेळाडूने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा होता विरोध

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिका हरली पण इम्रान ताहिरने रचला इतिहास

…म्हणून आयसीसीने न्यूझीलंड संघाला सुनावली ही शिक्षा