धावांचा रतिब घालणाऱ्या मयांक अगरवालच्या नावावर दुसऱ्याच कसोटीत नकोसा विक्रम

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आजपासून चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदजीचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात भारताकडून सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने 112 चेंडूत 77 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. मयंकचा हा कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना आहे.

त्याने त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यातही पहिल्या डावात 76 धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याने आज दुसऱ्यांदा शतक करण्याची संधी दवडली आहे.

त्याचबरोबर तो कसोटी कारकिर्दीत पहिल्या दोन सामन्यातील प्रत्येकी पहिल्या डावात अर्धशतक करणारा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी दत्तू फडकर, राहुल द्रविड, अरुण लाल यांनी त्यांच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातील प्रत्येकी पहिल्या डावात अर्धशतक केले होते.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेत मयंकने तीन डावात आत्तापर्यंत 195 धावा केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या सिडनी कसोटीत त्याने चेतेश्वर पुजारा बरोबर दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची शतकी भागीदारी केली आहे. पुजारानेही या सामन्यात त्याचे 18 वे कसोटी शतक पूर्ण केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाचा तारणहार चेतेश्वर पुजाराचा कांगारूंविरुद्ध विक्रमांचा डंका

विराट कोहली एक्सप्रेस सुसाट, सचिन, लाराचे विक्रम मोडीत

एका तासांत केएल राहुलबद्दल झाले तब्बल ५१३४ ट्विट, भारतात पहिल्या नंबरवर ट्रेंडिंग