भारताच्या विजयानंतर कोण काय म्हणाले ?

इंदोर । भारतीय संघाने काल ऑस्ट्रेलिया संघावर तिसऱ्या वनडेत विजय मिळवून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयाबरोबर भारतीय संघ आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहचला आहे.

भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी या सामन्यानंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहलीचा समावेश आहे.

बुमराह म्हणतो…
खेळ तुमचे चरित्र घडवत नाही तर त्याचा उलगडा करते. हा विजय मोठा आहे. सदैव ध्यानात ठेवण्यासारखा.
Sports doesn’t build character; it reveals it. What a great series win for all of us. A moment to cherish forever.
#IndvsAus #NumberOne✌?

अजिंक्य रहाणे म्हणतो….
कालचा विजय मोठा होता. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. हा संघाचा विजय अजून रोहित आणि हार्दिकने चांगली कामगिरी केली.
Great win last night✌️✌️ thank you all for love and support. Great team effort @ImRo45 @hardikpandya7

रोहित शर्मा म्हणतो…
भारतीय संघासाठी खरंच भारी दिवस आहे. आम्ही मालिका जिंकलो. आयसीसी वनडे क्रमवारीत पहिले आलो. टी२० विश्वचषक विजेतेपदाचीही १० वर्ष पूर्ण झाली.
What a day for Indian cricket, winning the series, becoming no.1 in ODIs and the 10th anniversary of the inaugural World Cup win ??

कर्णधार कोहली म्हणतो…
हार्दिकने खूप चांगली कामगिरी केली आणि खुश आहोत…
Ladies and gentlemen, here is the man of the moment @hardikpandya7(Also @klrahul11 at the back)???
Great win, series clinched? #NumberOne☝️

हार्दिक पंड्या कर्णधार कोहलीच्या ट्विटवर प्रतिक्रिया देतो…
तुझ्या प्रेरणेसाठी आणि पाठिंब्यासाठी आभारी आहे कर्णधार… ३-० अशी विजयी आघाडी घेणं हे भारी आहे.
Thank you for all the motivation and support Skipper ❤️
Great feeling to go 3-0 up and clinch the series! ?
#INDvAUS #TeamWork #NumberOne