दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून खेळणाऱ्या ११ खेळाडूंची यादी सोशल माध्यमांवर लिक

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात आजपासून (9 आॅगस्ट)  दुसरा कसोटी सामना सुरु होणार होता. पण पावसाचा व्यत्यय आल्याने नाणेफेकीला उशीर झाला आहे.

पण त्याआधीच भारत आणि इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटीत खेळणाऱ्या 11 खेळाडूंची नावे लिक झाली आहेत.

लिक झालेल्या 11 जणांच्या भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या कसोटीतील भारतीय संघच कायम ठेवण्यात आला आहे.

तर इंग्लंड संघात दोन बदल झाले आहेत. ख्रिस वोक्स आणि 20 वर्षीय ओली पोपचा 11 जणांच्या सामावेश करण्यात आला आहे.

विराटने सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत या खेळपट्टीवर दोन फिरकी गोलंदाज खेळवणार असल्याचे संकेत दिले होते.

परंतू पाऊस पडल्याने विराटचे आणि संघ व्यवस्थापनाची मते बदलली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचीत गोलंदाजीत कोणताही बदल झालेला नसावा.

भारतीय संघाला पहिल्या कसोटीत 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. तसेच पहिल्या सामन्यात भारताला 194 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली व्यतिरिक्त अन्य भारतीय फलंदाजांना दोन्ही डावात मिळून प्रत्येकी 60 धावाही करता आल्या नव्हत्या.

तसेच पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारालाही 11 जणांच्या संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे भारतीय फलंदाजीवर जोरदार टीका करण्यात आली होती.

परंतू या लिक झालेल्या भारतीय संघातही दुसऱ्या सामन्यासाठीही चेतेश्वर पुजाराला 11 जणांच्या संघातून वगळण्यात आले आहे.

असे आहेत लिक झालेले 11 जणांचे संघ-

भारत: विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा.

इंग्लंड: जो रूट (कर्णधार), जेम्स अॅंडरसन, जॉनी बेअस्ट्रो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, अॅलिस्टर कुक, सॅम करन, केटॉन जेनिंग्स, ओली पोप, आदिल राशिद आणि ख्रिस वोक्स.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

फक्त त्या कारणामुळे भारतच मारणार लॉर्ड्सचे मैदान!

भारताच्या या माजी खेळाडूंनी केला महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज

मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने लॉर्ड्सवरील घंटा वाजवल्यानंतर होणार भारत-इंग्लंड कसोटी सामन्याला सुरुवात