हैदराबाद संघात वॉर्नरची जागा भरून काढणार हा खेळाडू

आयपीएलचा ११ वा मोसम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक संघांनी आपला सराव देखील सुरु केला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या बॉल छेडछाड प्रकरणामुळे राजस्थान आणि हैद्राबाद यांच्या संघ व्यवस्थापकांची मात्र झोप उडाली होती.

स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांना घालण्यात आलेल्या एक वर्षाच्या बंदीमुळे ते या मोसमात सहभागी होऊ शकत नाहीत. त्यांच्या जागी बदली खेळाडू आणणे हे देखील एक जिकिरीचं काम आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार स्मिथ ऐवजी राजस्थान संघ हेइंरीच क्लास्सेनला घेण्यास इच्छुक आहे. क्लास्सेन फिरकी गोलंदाजांना उत्तम खेळतो आणि त्यामुळे स्मिथची जागी तो भरून काढू शकतो, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.   

स्मिथ आणि वॉर्नरची जागा भरून काढणं काही सोपं नाही. आज हैद्राबाद संघाने आपला वॉर्नर ऐवजी खेळणार असलेल्या खेळाडूचे नाव घोषित केले. अॅलेक्स हेल्स या इंग्लंडच्या तडाकेबाज फलंदाजाला त्यांनी आपल्या संघात घेतले आहे.

अॅलेक्स हेल्सला हैद्राबाद संघाने त्याच्या मूळ किमतीला (१ कोटी रुपये) विकत घेतले. नोंदणीकृत आणि शिल्लक खेळाडूंच्या यादीतून हेल्सला हैद्राबादने आपल्या संघात घेतले. टी-२० क्रिकेट मध्ये आजवर शतक झळकावणारा हेल्स हा एकमेव इंग्लिश खेळाडू आहे.  हैद्राबाद संघात तो वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीवीराची भूमिका पार पाडेल.