पुणे एका धावेने उणे…

पुण्याला हरवून मुंबईने तिसऱ्यांदा केला आयपीएलचा कप आपल्या नावे.

 

इंडियन प्रीमिअर लीग च्या १०व्या मोसमाचा अंतिम सामना काल हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियम वर पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने पुण्याला १ धावाने हरवून आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला. मुंबईने आतापर्यंतच्या १० मोसमात सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकण्याचा मान पटकावला आहे.

 

नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला साजेशी सुरवात मात्र त्याच्या सलामीच्या फलंदाजांना देता आली नाही. डावाच्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये जयदेवने पार्थिव पटेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला,  त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये सिमन्सचा स्वतःच्याच गोलंदाजीवर सुरेख झेल घेऊन जयदेवने त्याला बाद केले. त्यानंतर मुंबईच्या थोड्य थोड्य काळाच्या अंतराने गडी बाद होत राहिले. आंबटी रायडूला बाद करण्यासाठी स्टिव्ह स्मिथने लॉन्ग ऑफ वरून उत्तम डायरेक्ट हिट केला आणि त्याला धावबाद केले. त्यानंतर
एडम झाम्पाने रोहित शर्माला २४ वर पायचीत केले.

 

पोलार्ड मैदानावर आल्या आल्या त्याने झाम्पाला षटकार लगावला. त्यानंतर खेळपटीच्या अगदी समोर एक फिल्डरलावून त्याच ओव्हरमध्ये झाम्पाने पोलार्डचा काटा काढला. हार्दिक पंड्याही १४व्या ओव्हरमध्ये ख्रिसचनचा शिकार बनला. कृणाल पंड्या मात्र एका बाजूला तळ ठोकून होता. आठव्या विकेटसाठी त्याने जॉन्सन बरोबर ५० धावांची भागीदारी केली आणि मुंबई इंडियन्सचा स्कोर १२९ एवढा झाला.

 

पुण्याला १२० चेंडूत १३० धावा करायच्या होत्या, धावा कमी असल्यामुळे लागणारा रनरेट आटोक्यात पहिल्यापासून होता. विचार केला तर पुणे हा सामना सहज जिंकेल असे दिसून येत होते, पण हा आयपीएलच्या फायनलचा सामना होता आणि त्यातपण महाराष्ट्रातील दोन संघांचा मग तो सामना एवढा सोपा कसा काय होणार.

 

पुण्याच्या फलंदाजीच्या ही तिसऱ्याच ओव्हरमध्ये त्रिपाठीला बुमराने पायचीत केले. त्यानंतर स्मिथ आणि रहाणे मध्ये चांगली भागीदारी होत होती पण तेवढ्यतच राहणेने जॉन्सनच्या गोलंदाजीवर मिड ऑनवर फटका मारताना पोलार्डकडे झेल देऊन बाद झाला. १२व्या ओव्हरला ७१ वर २ बाद अशी स्थिती होती. धोनी आणि स्मिथ खेळपट्टीवर होते सामना पुण्याच्या हातात होता. तेव्हा रोहित शर्माने बुमराच्या हातात चेंडू दिला. त्याने कर्णधारला निराश केले नाही आणि धोनीला बाद केले. आत सर्व दबाव पुण्यावर होता.

 

शेवटच्या शतकात ११ धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर तिवारीने चौकार लगावला. जॉन्सनने पुढच्याच चेंडूवर तिवारीला बाद केले. स्मिथ स्ट्राईक वर आला पण तोही षटकार मारण्याच्या नादात रायडूकडे झेल देऊन बसला. आता एकही चेंडू न खेळलेले दोन फलंदाज ख्रिसचन आणि सुंदर खेळपट्टीवर होते सुंदर ने ३ बॉल ७ धावांची गरज असताना १ बाय धाव घेऊन ख्रिसचनला स्ट्राईक दिली. ख्रिसचॅनने जोरात फटका मारण्याच्या नादात हार्दिकच्या हातात बॉल मारला पण हार्दिकने झेल सोडला. त्यात यांनी दोन धावा काढल्या, पुण्याला १ बॉल ४ धावा हव्या होत्या आणि पुणे केवळ २ धावाच काढू शकले. अश्यातऱ्हेने मुंबईने पुण्याला अंतिम सामन्यात १ का धावाने हरवले. या सामन्याचा मानकरी कृणाल पंड्या ठरला.

 

मुंबईने जरी आयपीएल २०१७ ची आयपीएल जिंकली असेल तरी पुण्याने अनेक क्रिकेट रसिकांची मने जिंकली हे नक्की.