‘कॅप्टन कूल’ विरुद्ध ‘कॅप्टन हॉट’ यांच्यात कोण मारणार बाजी

बेंगलोर। आजचा सामना हा बहुप्रतीक्षित सामन्यांपैकी एक आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. कारण आयपीएलचा सामना क्रमांक २४ आहे भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी विरुद्ध भारताचा वर्तमान कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत.

चेन्नई गुणतालिकेत 5 पैकी 4 विजयामुळे 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बेंगलोरने मात्र दोनच सामने जिंकले असून ते सहाव्या स्थानावर आहे.

2016ला पात्रता फेरीत बेंगलोर विरूध्दच्या सामन्यात चेन्नईकडून आशिष नेहराने चांगली कामगिरी केली होती. आता तोच बेंगलोरचा गोलंदाज प्रशिक्षक आहे.

सौजन्य: अल्फा प्रेडीक्शन्स

 

 

 

 

 

 

 

 

 

चेन्नई फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या तीनही विभागात अग्रेसर आहे. तर बेंगलोरची फलंदाजाची फळी जरी उत्तम असली तरी शेवटच्या षटकातील गोलंदाजी हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे.

चेन्नईकडे फलंदाजीत कर्णधार एम एस धोनी सह सुरेश रैना, अंबाती रायडू, शेन वॉटसन तर गोलंदाजीत दीपक चहर (5 सामन्यात 6 विकेट्स), इम्रान ताहीर तसेच अष्टपैलू खेळाडू, ड्वेन ब्रावो आहे.

सौजन्य: अल्फा प्रेडीक्शन्स

 

 

 

 

 

 

 

 

 

हैद्राबाद विरूध्दच्या अटीतटीच्या सामन्यात क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केल्याने चेन्नईने त्यांना त्याच्यांच घरात 4 धावांनी पराभूत केले होते.

बेंगलोरकडे कोहली बरोबरच एबी डिव्हिलियर्स, क्विंटॉन डी कॉक आणि मंदीप सिंग हे फलंदाज आहेत. गोलंदाजीत उमेश यादव (5 सामन्यात 8 विकेट्स), ख्रिस वोक्स (5 सामन्यात 8 विकेट्स) आणि युजवेंद्र चहल हे आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बेंगलोरने 2014 पासून चेन्नईला पराभूत केले नाही. तर हे पराभवाचे सत्र आजतरी कोहली मोडीत काढेल का?

तर आजचा सामना ‘कॅप्टन कूल’ का ‘कॅप्टन हॉट’ यापैकी कोण जिंकणार असा सवाल अनेकांच्या मनात आहे.

कधी होईल आयपीएल २०१८ मधील  रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज सामना?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा चोविसावा सामना आज, 25 एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील आजचा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे होईल. तसेच या मैदानावरच बेंगलोरचे सर्व घरचे सामने होणार आहेत.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज बेंगलोर सामना?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज  सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

सौजन्य: अल्फा प्रेडीक्शन्स

 

 

 

 

 

 

 

 

 

 

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार ), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस वोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, सर्फराज खान, मोहम्मद सिराज, मोईन अली, कोरे अॅण्डरसन, मुरूगन अश्विन, अनिकेत चौधरी, कोलीन डी ग्रॅनधोमे, पवन देशपांडे, अनिरूध्द जोशी, कुलवंत खेर्जोलिया, पवन नेगी, पार्थिव पटेल, नवदिप सैनी, टीम साउथी, मनन वोहरा.

चेन्नई सुपर किंग्ज: एम एस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, फाफ डू प्लेसिस, ड्वेन ब्रावो, केदार जाधव, शेन वॉटसन, अंबाती रायडू, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, एन जगदीसन, मुरली विजय,सॅम बिलिंग्स, शार्दूल ठाकूर, लुंगी एन्गिडी,मोनू सिंग कुमार, केएम असिफ, मार्क वूड, दीपक चहर, कनिष्क सेठ, ध्रुव शोरे, क्षितिज शर्मा, चैतन्य बिष्णोई.