विराट कोहलीने धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यामागील हे आहे सिक्रेट

भारताचा सध्याचा नियमित कर्णधार विराट कोहलीने नेतृत्वाच्या अनेक गोष्टी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीकडून शिकले असल्याचे सांगितले आहे. धोनी हा नेहेमीच युवा खेळाडूंना तसेच विराटला मैदानावर मार्गदर्शन करताना मैदानात दिसत असतो.

धोनीबद्दल विराटने नुकतेच सांगितले की त्याने पहिल्या स्लीपमध्ये धोनीजवळ उभे राहून त्याने खूप गोष्टी शिकल्या आहेत.

धोनीने कसोटीमधून 2014 मध्येच निवृत्ती घेतली आहे. तर 2017 मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटचेही कर्णधारपद सोडले आहे. त्यानंतर विराटला भारताच्या कर्णधापदाची धूरा सोपवण्यात आली.

भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधार धोनीबद्दल बोलताना विराट म्हणाला, ” मी असा आहे की नेहमी त्याच्याशी (धोनी) खेळाबद्दल बोलत असतो. अगदी मला उपकर्णधार बनवण्याआधी मी युवा असताना मी त्याला अनेक गोष्टी सुचवायचो.”

“या गोष्टी मला जास्त माहिती आहे म्हणून नाही तर मला त्या क्षणाला तसे वाटते म्हणून आणि मला काही गोष्टी दिसायच्या ज्या बाकीच्या कोणाला दिसायच्या नाहीत.”

“मला खेळाबद्दल विचार करायला आवडतो आणि म्हणूनच मी नेतृत्व करताना त्याची मजा घेतो. मला धावांचा पाठलाग करायला आवडते. मला खेळताना काय करायची गरज आहे हे जाणून घेताना माझी बुद्धी वापरायला आवडते. मी एमएस कडून क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खूप जवळ स्लीपला उभे राहून आणि त्याचे फक्त जवळून निरिक्षण करुन खूप गोष्टी शिकलो आहे.”

त्याचबरोबर विराट म्हणाला की प्रत्येक कर्णधार आणि त्याचे विचार वेगळे असतात. तसेच तो म्हणाला की तो त्याचा खेळ हा सकारात्मकतेने खेळतो.

तसेच तो पुढे म्हणाला, ‘मी आत्तापर्यंत माझ्या खेळाची मजा घेतली आहे. मला या स्तरावर क्रिकेट खेळायचे आहे आणि मला अभिमान आहे की मी माझ्या देशाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे माझी याबद्दल कोणतीही तक्रार नाही. मला खूप कष्ट करुन माझे योग्य उदाहरण समोर ठेवायचे आहे. यामुळे मी माझ्या संघसहकाऱ्यांकडूनही कष्टाची अपेक्षा करतो.’

महत्वाच्या बातम्या –

अखेर रविंद्र जडेजाने तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाच!

Video: विराट कोहली, मिराबाई चानूने राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला खेलरत्न पुरस्कार

टीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण