तिसरा वनडे : पहिल्या डावात भारताने केले एवढे विक्रम !

कानपुर । येथील ग्रीन पार्क मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि महत्वपूर्ण सामन्यात भारताने न्यूझीलंड संघापुढे ३३८ धावांचे लक्ष ठेवले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या शतकाच्या जोरावरच भारतीय संघ एवढ्या धावांचा डोंगर उभारू शकला. 

विराट कोहलीने या सामन्यात आपले वनडे कारकिर्दीतील ३२वे शतक केले तर रोहितने ही १४७ धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताला मालिका जिंकण्यासाठी न्यूझीलंडला आता ३३८ धावांच्या आत रोखणे गरजेचे आहे. 

 या सामन्यातील पहिल्याच डावात भारतीय फलंदाजांनी अनेक विक्रम केले पाहुयात काय आहेत ते विक्रम. 

१. विराट कोहलीचे २०१७ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१०४ धावा पूर्ण. कसोटी ४४९, वनडे १४६० आणि टी२० १९५.

२. या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करणारा तो पहिला तर हाशिम अमला दुसरा फलंदाज.

३. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात २००० पेक्षा जास्त धावा करण्याची ही विराटची चौथी वेळ आहे.

४. विराटाचे हे या वर्षातीलवनडेतील ६वे शतक आहे. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षातील सर्वाधिक शतके विराट कोहलीच्याच नावे

५. विराट कोहलीने या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१०४ धावा ६०.११ च्या सरासरीने पूर्ण केल्या आहेत.

६. रोहित शर्माने आज १४७ धावांची खेळी केली. या वर्षी भारतीय फलंदाजाकडून ही सार्वधिक धावांची दुसरी मोठी खेळी

७. कर्णधार म्हणून वनडे मधील हे विराटचे १० वे शतक आहे.

८. कानपुर मधील मागील दोन्ही सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.

९. भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक ५० पेक्षा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ३५ वेळा ५० पेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

१०. या वर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावे आहेत. त्याने १४६० धावा केल्या आहेत. त्यानंतर भारताचाच सलामीवीर रोहित शर्मा या यादीत आहे. त्याने १०७६ धावा केल्या आहेत.

११. एका वर्षात वनडे मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने या वर्षात कर्णधार म्हणून १४६० धावा केल्या आहेत.

१२. विराटने या वर्षी वनडेत १४६० धावा केल्या आहेत. मागील १० वर्षात कोणत्याही भारतीय फलंदाजापेक्षा एका वर्षात या जास्त आहेत.

१३. भारतासाठी सर्वाधिक १०० धावांची भागीदारी करणाऱ्या जोडीच्या यादीत विराट आणि रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी १२ वेळा १०० धावांची भागीदारी केली आहे.

१४. रोहितने आज वनडे कारकिर्दीतील १५० षटकार पूर्ण केले. असे करण्यासाठी त्याने शाहिद आफ्रिदीनंतर सर्वात कमी डाव खेळले. त्याने १६५ डावात १५० षटकार पूर्ण केले आहेत.

१६. रोहित शर्मा हा पाचवा असा भारतीय फलंदाज बनला आहे ज्याने वनडेत १५० षटकार लगावले आहेत.

१७. विराटने कर्णधार म्हणून सर्वात जलद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५,०६५ धावा पूर्ण केल्या आहेत.

१८. रोहित शर्मा सर्वात जलद १५० षटकार मारणारा भारतीय तर जगातील दुसरा फलंदाज आहे.

१९. वनडेमध्ये सर्वात जलद ९००० धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर आहे, त्याने यासाठी फक्त १९४ डाव खेळले आहेत.

२०. वनडेमध्ये सर्वाधिक वेळा २०० धावांची भागीदारी करण्याचा विक्रम आता विराट आणि रोहितच्या नावावर आहे. त्यांनी ४ वेळा २०० धावांची भागीदारी केली आहे.

२१. सर्वाधिक वेळा २०० धावांच्या भागीदारीत असणाऱ्या फलंदाजांच्या यातील विराट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ११ वेळा अशी कामगिरी केली आहे.

२२. कर्णधार म्हणून वनडेत एका वर्षात ६ शतके करणारा विराट पहिला फलंदाज बनला आहे.

२३. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादतीत २० शतकांसह विराट आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.

२४. भारतीय संघाने सर्वाधिक म्हणजेच ९९ वेळा ३०० धावांचा टप्पा पार केला आहे.