दुसरी कसोटी: भारतासमोरील संकटे वाढली; दक्षिण आफ्रिकेकडे मोठी आघाडी

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत भारतासमोरील संकट वाढवले आहे. एकवेळ २ बाद ३ अशी अवस्था असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने नंतर संयमी फलंदाजी करत ५ बाद २०६ अशी चांगली धावसंख्या उभारली आहे.

यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे सध्या २३४ धावांची आघाडी असून अजूनही त्यांचे ५ फलंदाज बाकी आहेत. विशेष म्हणजे कर्णधार फाफ डुप्लेसी सध्या ८५ चेंडूत २३ धावांवर खेळत आहे. त्याला दुसऱ्या बाजूने ७१ चेंडूत २४ धावा करत व्हर्नोन फिलँडर चांगली साथ देत आहे.

आज कालच्या २ बाद ९०वरून पुढे खेळायला सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलिअर्स (८०) आणि डीन एल्गार(६१) जोडीने चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.

आज दक्षिण आफ्रिकेच्या ज्या तीन विकेट्स गेल्या त्या मोहम्मद शमीला मिळाल्या. अन्य गोलंदाजांना आज कोणतेही यश मिळाले नाही.

सामन्याचा आज चौथा दिवस असून आजचे एक सत्र अजूनही बाकी आहे. भारतीय संघ फलंदाजी मिळाल्यावर कशी कामगिरी करतोय यावर या सामन्याच आणि मालिकेचं भविष्य अवलंबून आहे.