भारतीय क्रिकेट संघाचे केपटाउनमध्ये आगमन

केपटाउन । भारतीय क्रिकेट संघाचे आज केपटाउन येथे आगमन झाले. संघाने काल सकाळी मुंबईवरून दक्षिण आफ्रिकेसाठी प्रयाण केले होते.

भारतीय संघ येथे ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत भाग घेणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी, ६ वनडेत आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.

बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून आज संघ हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.