पहा: भारतीय क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षणाचा सराव

पल्लेकेल: आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना येथे होणार आहे. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

श्रीलंका संघ हा जरी सर्व आघाड्यांवर कमजोर वाटत असला तरी भारतीय संघ त्यांना कोणत्याही प्रकारची संधी देण्याच्या मूडमध्ये नाही. म्हणून फलंदाजी आणि गोलंदाजी याबरोबर भारतीय संघ क्षेत्ररक्षणावरही भर देत आहे. म्हणूनच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणाचा जोरावर सराव करून घेत आहे.

आज बीसीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या एका खास विडिओमध्ये अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केदार जादव आणि कर्णधार कोहली यांनी चांगलाच घाम गाळलेला दिसत आहे.

पहा हा संपूर्ण विडिओ: