शांघाय ओपन: भारताचा रोहन बोपण्णा पहिल्याच फेरीत बाद

काल पासून चीनमध्ये शांघाय ओपन स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेत राफेल नदाल, रॉजर फेडरर यांसारखे दिग्गज टेनिसपटू खेळणार आहेत. या स्पर्धेत एकेरी तसेच दुहेरी सामने होणार आहेत.

भारताचा टेनिस खेळाडू रोहन बोपण्णा हा पी.क्यूवासच्या साथीने दुहेरी स्पर्धेत खेळण्यासाठी उतरला होता परंतु, पहिल्याच फेरीत त्याला अपयशाला सामोरे जावे लागले आहे.

पहिला सेट जिंकूनही बोपण्णा आणि क्यूवासला आघाडी टिकवता आली नाही. पहिला सेट त्यांनी ६-३ असा जिंकला होता. परंतु ही आघाडी त्यांना दुसऱ्या सेटला राखता न आल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी एल. पौईल आणि एन. कार्गोईस जोडीने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत तिसरा सेटही जिंकला. त्याचबरोबर सामनाही जिंकला.

एल. पौईल आणि एन. कार्गोईस जोडीने बोपण्णा आणि क्यूवास या जोडीलाला ६-३,३-६,५-१० ने असा विजय मिळवला.