श्रीलंका दौऱ्यासाठी असा असेल भारतीय संघ

२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात रोहित शर्माने पुनरागमन केले असून मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे.

भारतीय संघात दुखापतींनंतर लोकेश राहुलच पुनरागमन होत असून १६ खेळाडूंच्या या संघात मुरली विजय आणि अभिनव मुकुंद हे अन्य सलामीवीर आहेत. फॉर्ममध्ये नसलेल्या करुण नायरला मात्र वगळण्यात आले आहे.

श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात हार्दिक पांड्याचाही समावेश असून त्याला कसोटीमध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार) , मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), रोहीत शर्मा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान सहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दीक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद