मितालीच्या विक्रमांच्या यादीत आणखी एक मनाचा तुरा

11 सप्टेंबर 2018 पासून भारतीय महीला संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंका महिला संघावर विजय मिळवला होता. मात्र श्रीलंका दौऱ्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंका महिला संघाने 3 विकेटने विजय मिळवला. अजूनही भारतीय संघाची आघाडी 2-1 अशी राहीली आहे.

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने 125 धावांची कर्णधाराला साजेशी कामगिरी करत आपल्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येची नोंद केली. मितालीने कारकीर्दीतील 7 वे आणि मागील 14 महीन्यातील 1 ले शतक केले. तिने आपल्या खेळी दरम्यान 143 चेंडूचा सामना करताना 14 चौकार आणि 1 षटकार लगावले. स्मृती मंधनाने 51 धावा करत मितालीला उत्तम साथ दिली. त्या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. 50 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघांने 253 धावा केल्या.

भारतीय महीला संघाने दिलेल्या 254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या महिला संघाची कर्णधार चमरी अट्टापट्टू आणि तिची सलामीची जोडीदार हासिनी परेरा यांनी 101 धावांची सलामी दिली. हासिनी परेरा ही 45 धावसंख्येवर बाद झाली.

चमरी अट्टापट्टू हिने एक बाजू लावून धरत आपले शतक पूर्ण करत 115 धावांची खेळी केली. लागोपाठ मिळालेल्या विकेटमुळे भारतीय महिला संघाला विजयाची आशा निर्माण झाली होती. शेवटच्या ओव्हर मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कविशा दिलहारीने दिप्ती शर्माच्या या ओव्हर मध्ये 5 व्या चेंडूवर चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केला.

दौऱ्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे.

118 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम मिताली नावे झाला आहे.

हा विक्रम करताना तिने इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्डला मागे टाकले आहे. एडवर्डने 117 वनडे सामन्यात इंग्लंड महिला संघाचे नेतृत्व केले आहे. या दोघींनीही प्रत्येकी 72 सामन्यात विजय मिळवले आहेत.

सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणाऱ्या महिला कर्णधार-

118 सामने मिताली राज

117 सामने शार्लोट एडवर्ड

101 सामने बेलिंडा क्लार्क

76 सामने सुझी बेट्स

74 सामने मेरिसा अॅग्युलेरा

महत्त्वाच्या बातम्या:

रोनाल्डोला युवेंटससाठी पहिला गोल करण्यास लागले तब्बल ३२० मिनिटे

पाकिस्तानचे हे पाच खेळाडू ठरु शकतात भारताला डोकेदुखी

…अखेर लाल माती गहिवरली!!!