एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाने २० वर्षांनंतर केला अंतिम फेरीत प्रवेश

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. उपांत्य सामन्यात त्यांनी तीन वेळचा चॅम्पियन असलेल्या चीन संघाला 1-0 असे पराभूत करत 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचला आहे.

ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने 52व्या मिनिटाला केलेल्या पेनाल्टी कॉरर्नवर भारताला आघाडी मिळाली.

भारताने 1982ला एशियन गेम्सचे विजेतेपद मिळवले आहे. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच सहभाग घेतला होता. तसेच 1998ला बॅंकॉक गेम्समध्ये अंतिम फेरीत पराभूत झाले होते.

उद्या (31 ऑगस्ट) होणाऱ्या अंतिम फेरीत भारत जपानशी भिडणार आहे. जपानने उपांत्य सामन्यात पाच वेळेचा चॅम्पियन दक्षिण कोरियाला 2-0ने पराभूत केले आहे.

चीन विरुद्धच्या सामन्यात भारताला आठव्याच मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाली होती. पण गुरजीतचा तो शॉट गोलकिपरने रोखला. दोन्ही संघाने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या होत्या.

तसेच तिसऱ्या सत्रात गुरजीतने ड्रॅग-फ्लिकर शॉट केला पण तो चायनीज डिफेंडरच्या पायाला लागून गेल्याचे रिव्ह्यूमध्ये सिद्ध झाल्याने तो शॉट बाद झाला.

39व्या मिनिटाला भारताला परत एकदा पेनाल्टी मिळाली पण गुरजीत त्याला योग्य ती न्याय नाही देऊ शकली.

चौथ्या निर्णायक सत्रात गुरजीतने गोल केल्याने भारताचा विजय पक्का झाला. शेवटच्या आठ मिनिटांमध्ये चीनने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या बचाव फळीने चीनला रोखून ठेवले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पहिल्याच दिवशी काही मिनीटांत इशांतचा कसोटीत मोठा पराक्रम

एशियन गेम्स: स्वप्ना बर्मनने मिळवून दिले भारताला हेप्टॅथलॉनमधील पहिले सुवर्णपदक

एशियन गेम्स: तब्बल ४८ वर्षांनंतर भारताला ट्रीपल जम्पमध्ये सुवर्णपदक