आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाची विजयी सलामी; जाणून घ्या महिला कबड्डीचे सर्व निकाल

-अनिल भोईर

जकार्ता। इंडोनेशिया येथे सुरू झालेल्या १८ व्या आशियाई गेम्समध्ये आज पासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली.

आशियाई स्पर्धेत ९ महिला कबड्डी संघांनी सहभाग घेतला आहे, आशियाई स्पर्धेत महिला कबड्डी स्पर्धेची ही तिसरी वेळ असून पहिल्या दोन्ही स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.

भारत विरुद्ध जपान या महिलांच्या सामन्याने कबड्डी स्पर्धेची सुरुवात झाली. भारतीय महिला संघ ‘अ’ गटात असून भारतीय महिला कबड्डी संघाने जपानचा ४३-१२ असा पराभव करत विजयी सलामी दिली.

भारताकडून कर्णधार पायल चौधरी, रणदीप, सोनाली शिंगटे यांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर महिलांच्या कबड्डीच्या दुसऱ्या सामन्यात इराणने कोरियावर ४६-२० अशी सहज मात केली.

‘अ’ गटात श्रीलंका संघाचा थायलंडने पराभव करत विजयी सलामी दिली. बांगलादेश महिला संघाला चायनिज तैपाईने पराभवाचा धक्का दिला. पहिला दिवशीच्या महिलांच्या शेवटच्या सामन्यात इंडोनेशियाने ३०-२२ असा जपानचा पराभव केला. स्पर्धतील जपानचा सलग दुसरा पराभव झाला.

भारतीय महिला कबड्डी संघाचा ‘अ’ गटात दुसरा सामना २० ऑगस्टला थायलंड विरुद्ध होईल.

आशियाई क्रीडा स्पर्धा (१९ ऑगस्ट)
महिला कबड्डी स्पर्धेचे सर्व निकाल:

१) भारत ४३ विरुद्ध जपान १२
२) इराण ४६ विरुद्ध कोरिया २०
३) श्रीलंका १५ विरुद्ध थायलंड ४१
४) बांगलादेश २८ विरुद्ध चायनिज तैपाई ४३
५) इंडोनेशिया ३० विरुद्ध जपान २२

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

इंग्लंड विरुद्ध भारत: कोहली-रहाणे यांनी केलेल्या भागीदारीने भारत पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०७ धावा

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 10 वर्षे पूर्ण…

रिषभ पंत झाला या भारतीय युवा यष्टीरक्षकांच्या यादीत सामील