एशियन गेम्स: भारतीय महिला कबड्डी संघाचा उपांत्य सामन्यात विजय; तिसऱ्या सुवर्णपदका पासून एक पाऊल दूर..

-अनिल भोईर

आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने उपांत्य सामन्यांत चायनीज तैपाईचा पराभव करत आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला संघाने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

भारत विरुद्ध चायनीज तैपाई उपांत्य सामना सुरुवातीला चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत चायनीज तैपाईने सावध खेळ करत तिसऱ्या चढाईवर खेळ केला. तैपाईने दोन सुपर कॅच करत भारताला जास्त आघाडी घेण्यापासून रोखून धरले. मध्यंतरा ११-०८ अशी आघाडी भारताकडे होती.

मध्यंतरानंतर भारताने आक्रमक खेळ करत चायनीज तैपाईला ऑल आऊट करुन सामन्यावर पकड मिळवली. भारताने २७-१४ असा विजय मिळवत आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघ तिसऱ्या सुवर्णपदक मिळवण्यापासून एक पाऊल दूर आहे.

भारताकडून पायल चौधरीने चढाईत ५ गुण मिळवले तर, रणदीपने ७ गुण मिळवले तिची एकदा सुपर कॅच झाली. अष्टपैलू खेळाडू साक्षी कुमारीने ४ जबरदस्त पकडी करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: वुशू प्रकारात भारताला चार कांस्यपदक

एशियन गेम्स: १५ वर्षीय विहानला दुहेरी ट्रॅपमध्ये रौप्यपदक