पराभूत होऊन देखील भारतीय महिला क्रिकेट संघाने जिंकली भारतीयांची मने !

 ‘ओ हारे लेकीन जी लगाके खेले’ वर्ल्ड कप फायनलमध्ये क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्डस मैदानावर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध इंग्लड सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लडने भारतासमोर २२९ धावांचे लक्ष ठेवले होते.  भारताला  १० गडी बाद 219 रनचा टप्पाच गाठता आला. मात्र या वर्ल्ड कप सिरीजमध्ये भारतीय महिला संघाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीने भारतीयांची मने जिंकली आहेत.

 इंग्लंडच्या संघाने दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली होती सलामीवीर स्मृती मंधानाला अंतिम सामन्यातही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. स्मृती बाद झाल्यानंतर कर्णधार मिताली राज आणि पुनम राऊत यांनी ३८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केलामात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात मिताली धावबाद झाल्यामुळे भारतीय संघ काहीसा संकटात सापडला.  या संकटात सापडलेल्या भारतीय टीमचा डाव पुनम राऊत आणि फलंदाजीचा सुरु गवसलेल्या हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी भागीदारीमुळे सावरला .  

 हरमनप्रीत आणि पुनमने  तिसऱ्या विकेटसाठी ९५ तगडी भागीदारी केली. हरमनप्रीतने ८० चेंडुंमध्ये ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ५१ धावांची खेळी केली. मराठमोळी असणारी पूनम राउत हिने तडाखेबाज फलंदाजी करत  ११५ चेंडुंमध्ये ८६ रणांची खेळी केली, मात्र इंग्लडच्या अॅनाने पुनमला पायचीत करुन भारताला पाचवा धक्का दिला. त्यामुळे इंग्लंडने सामन्यात पुन्हा पुनरागमन केलं . पूनम पाठोपाठ सुषमा वर्मा देखील लगेच बाद झाली त्यामुळे भारतीय संघ अजून एकदा संकटात सापडला . वर्मानंतर वेदा कृष्णमुर्ती ३५ धावांवर झेलबाद झाल्याने भारताच्या हातात आलेला डाव इंग्लंडने आपल्या बाजूने केला.  पुढे  विस्कटलेला भारताचा डाव सावरू न शकल्याने अटीतटीच्या सामन्यात अखेर इंग्लंडने वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला . मात्र भारतीय महिला खेळाडूंनी दिलेली झुंज भारतीयांनी चांगलीच भावली आहे