किंग कोहलीच्या बाबतीत झाला कोणालाही नको असलेला योगोयोग

पर्थ। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे आज(18 डिसेंबर) दुसरा कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. त्याने 257 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. मात्र तरीही या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे एक नकोसा योगायोग भारतीय संघाबरोबर झाला आहे.

हे शतक केल्यानंतर  विराट ऑस्ट्रेलियामधील पर्थमध्ये कसोटी शतक करणारा केवळ चौथा भारतीय फलंदाज ठरला होता. याआधी पर्थमध्ये सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ आणि सचिन तेंडुलकर यांनी शतके केली आहेत. पण त्यांनी ज्या सामन्यात शतके केली आहेत तेही सामने भारतीय संघ पराभूत झाला आहे.

म्हणजेच भारतीय संघातील फलंदाजाने पर्थमध्ये जेव्हाही शतक केले आहे तेव्हाही भारतीय संघ पराभूत झाला आहे.

गावसकर आणि अमरनाथ यांनी पर्थमध्ये 16-21 डिसेंबर 1977 दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात शतके केली होती. गावसकर यांनी 127 धावा आणि अमरनाथ यांनी 100 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताला 2 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता.

तसेच सचिनने 1-5 फेब्रुवारी 1992 दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 114 धावांची खेळी केली होती. या सामन्यातही भारत तब्बल 300 धावांनी पराभूत झाला होता.

यानंतर विराटने भारताकडून जवळजवळ 26 वर्षांनंतर पर्थमध्ये शतकी खेळी खेळी केली होती. परंतू या सामन्यातही भारतीय संघाला पराभवालाच सामोरे जावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाच्या सलामीवीरांनी केला असाही एक नकोसा विक्रम

पर्थ कसोटी: भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने केली मालिकेत बरोबरी

केएल राहुलला भारतात लवकर परतण्यासाठी चाहत्याने सुचवले हे विमान