18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत झील देसाई, नताशा पल्हा, स्नेहल माने या भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात    

पुणे: डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी)प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 18व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीच्या पहिल्या फेरीत झील देसाई, नताशा पल्हा, स्नेहल माने या भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत युक्रेनच्या सहाव्या मानांकित व्हॅलेरिया स्ट्राकोवा हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या झील देसाईचा 6-1, 6-4असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना 1तास 19मिनिटे चालला. जपानच्या पाचव्या मानांकित जुनरी नमिगता हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या स्नेहल मानेवर 6-0, 6-0असा एकतर्फी विजय मिळवला. जॉर्जियाच्या मरियम बोलकवडझ हिने लकी लुजर ठरलेल्या भारताच्या नताशा पल्हाचे आव्हान 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. क्वालिफायर तैपेईचे ची-यु सु हिने रशियाच्या  निका कुखरचूकचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 7-5असा संघर्षपूर्ण पराभव केला. लकी लुजर ठरलेल्या फ्रांसच्या जुली जेर्विसने रशियाच्या अमिना अंशबाचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-2असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचे उदघाटन एनइसीसीचे महाव्यवस्थापक बीएसआर शास्त्री, एमएसएलटीएचे उपाध्यक्ष आनंद तुळपुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे मानद सचिव विश्वास लोकरे, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव गिरीश इनामदार, स्पर्धेचे संचालक आणि डेक्कन जिमखानाचे टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, माजी टेनिसपटू राधिका तुळपुळे आणि आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):एकेरी गट: 

व्हॅलेरिया स्ट्राकोवा(युक्रेन)(6)वि.वि.झील देसाई(भारत)6-1, 6-4;

जुनरी नमिगता(जपान)(5)वि.वि.स्नेहल माने(भारत)6-0, 6-0;

कॅटरझायना पीटर(पोलंड)(7)वि.वि.जेसिका हो(यूएसए)6-0, 6-3;

मरियम बोलकवडझ(जॉर्जिया)वि.वि.नताशा पल्हा(भारत)6-4, 6-4;

ची-यु सु(तैपेई)वि.वि.निका कुखरचूक(रशिया)7-6(2), 7-5;

जुली जेर्विस(फ्रांस)वि.वि.अमिना अंशबा(रशिया)7-6(5), 6-2;

अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया) वि.वि.मर्याना चेरणेशोवा(युक्रेन)6-4, 6-0;

कॅटरझायना कावा(पोलंड)(3)वि.वि.फातमा अल नभानी(ओमान)7-5, 6-1;

दुहेरीगट:

पोलीना लेकीना(रशिया)/डायना मर्सीकेविचा(लातविया)वि.वि.नायजीना अब्दूरेमवा(उझबेकिस्तान)/एना मोरगिना(रशिया)6-0, 5-7, 10-8;

बिट्राईस गुमूल्या(इंडोनेशिया)/एना वेस्लीनोविक(मॉंटेनिग्रो)वि.वि.जिया-जिंग लू(चीन)/ याशिना इक्तेरिना(रशिया)6-3, 6-3;

शेरॉन फिचमन(कॅनडा)/व्हॅलेरिया सावींख(रशिया)(4)वि.वि.सेनिया पल्किना(कर्गिस्तान)/एरिका वोगेलसांग(नेदरलँड)6-0, 6-4;

बेरफू सेंगीज(टर्की)/जेस्सी रॉमपीज(इंडोनेशिया)वि.वि.एमराल्ड एबली(यूएसए)/सौम्या वीज(भारत)7-5, 6-1.