हा विजय खास, टीम इंडियाने मिळवला भारतात १००वा कसोटी विजय

राजकोट। भारत विरुद्ध विंडिज संघात आज पहिला कसोटी सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे.

भारताचा हा मायदेशातील 100 वा कसोटी विजय ठरला आहे. असा कारनामा याआधी आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांनी केला आहे.

भारताने आत्तापर्यंत 266 सामने मायदेशात खेळले आहेत. यातील 100 सामन्यात विजय तर 52 सामन्यात पराभव स्विकारले आहेत. तसेच 113 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि 1 सामना बरोबरीचा झाला आहे.

मायदेशात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत आॅस्ट्रेलियाचा संघ अव्वल क्रमांकावर असून त्यांनी 238 कसोटी सामने मायदेशात जिंकले आहेत. त्यांच्या पाठोपाठ इंग्लंड आहे. इंग्लंडने 217 सामने मायदेशात जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने मायदेशात 104 सामन्यात विजय मिळवले आहे.

भारताने आत्तापर्यंत एकूण 528 कसोटी सामने खेळले आहेत. यात 147 विजय तर 164 पराभवांचा समावेश आहे.

मायदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे संघ-

238 विजय – आॅस्ट्रलिया  (415 सामने)

217 विजय – इंग्लंड (515 सामने)

104 विजय – दक्षिण आफ्रिका (230 सामने)

100 विजय – भारत (266 सामने)

महत्वाच्या बातम्या-

टी२० मालिकेत पहिल्यांदाच एकाच संघाचे दोन उप-कर्णधार खेळणार

योगायोगांचा बाप! सामनावीर पुरस्कार स्विकारलेल्या पृथ्वी शाॅबद्दल घडून आला हा अजब योगायोग

अर्जून तेंडुलकर चमकला, मुंबईसाठी घेतल्या ५ विकेट्स