एशियन गेम्स: ब्रिजमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना अजुनही मिळाले नाही भारताचे अधिकृत ब्लेझर

इंडोनेशियात झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या प्रणब बरधन आणि शिभनाथ सरकार यांनी ब्रिज या प्रकारात पुरूष दुहेरीत सुवर्णपदक पटकावले असले तरी त्यांना अजुनही संघाची अधिकृत ब्लेझर आणि बक्षिसाची रक्कम सरकारकडून मिळाली नाही.

भारताने या 18व्या एशियन गेम्समध्ये एकूण 69 पदके जिंकली असून यात 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर यातील एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके ब्रिजमधून आली आहेत.

कोलकाता येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ब्रिज संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक देबासिस रे हे बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय ऑलिंपक संघटनेने (आयओए) अजुनही ब्रिजच्या खेळाडूंना नवीन ब्लेझर दिले नाही तर बंगाल सरकारने घोषित केलेली बक्षिस रक्कमही अजुन मिळाली नाही, असा खुलासा केला.

“पहिल्यांदाच आम्हांला सांगण्यात आले होते की, आम्हाला कोणतेही साहित्य पुरविले जाणार नाही. तसेच क्रिडा मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नामुळे आम्हाला जर्सी मिळाल्या पण ब्लेझर दिले गेले नाही. म्हणूनच आम्ही आमच्या जुन्या ब्लेझरवर आयओएचे लोगो शिवून घेतले”, असे रे म्हणाले.

“आयओएने स्पर्धेला सुरूवात होण्याच्या तीन दिवसांआधीच आमच्या संघाची नोंदणी केली होती. ते पण एचसीएलचे अध्यक्ष शिव नादर यांच्या मध्यस्थीने आम्हाला स्पर्धेत जाता आले”,असेही रे पुढे म्हणाले

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

राफेल नदालचा युएस ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश