भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी समावेशाबाबत संभ्रम…

पुढील महिन्यात सुरु इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या समावेशाबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील आठवड्यात बीसीसीआयची तातडीची बैठक मुंबई येथे बोलण्यात आली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेले बीसीसीआय आयसीसीच्या ‘रेव्हेनु कँटीन’ ला कसे सामोरे जायचे यासाठी ही मीटिंग बोलविण्यात आली आहे.

 

काही रिपोर्ट्स प्रमाणे भारतीय संघ आयसीसी मधील भारताच्या उत्पन्नामधील मतदानामधील पराभवामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घ्यायचीच जास्त शक्यता आहे.

 

भारतातील असंख्य जाहिरातदारांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी साठी गेल्या काही आठवड्यांपासून जाहिराती सुरु आहे. जर भारतीय संघ या स्पर्धेसाठी गेला नाही तर याचा मोठा फटका टीव्ही ऑडियन्सच्या संख्येला बसू शकतो आणि त्याचा परिणाम जाहिरातींवर आणि एकूण स्पर्धेच्या सर्वच गोष्टींवर होऊ शकतो.

 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची नावे पाठवायची शेवटची तारीख २५ एप्रिल होती. बाकी संघानी त्यांची नावे पाठवली. परंतु बीसीसीआयने आयसीसीच्या उत्पन्नावरील मतदानापर्यंत ‘वेट आणि वॉच’ ची भूमिका घेतली होती. अंतिम तारखेनंतर नाव पाठविल्यास कोणतीही शिक्षा किंवा पनिशमेंट आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या नियमात नाही.