भारताला तिन्ही कसोटी सामन्यात ३०९ पेक्षा जास्त धावांची आघाडी !

पल्लेकेल: येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आज श्रीलंकेचा डाव १३५ धावांत संपुष्ठात आणत तब्बल ३५२ धावांची आघाडी घेतली. भारताकडून कुलदीप यादवने ४ तर मोहम्मद शमी आणि आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

लंकेकडून कर्णधार चंडिमलने सर्वाधिक अर्थात ४८ धावा केल्या या कसोटी मालिकेत एक विशेष विक्रम याही सामन्यात कायम राहिला तो म्हणजे भारताने या मालिकेतील प्रत्येक सामन्यात कमीतकमी ३०९ धावांची पहिल्या डावात घेतली आहे.

भारताने पहिल्या कसोटी सामन्यात ३०९ धावांची, दुसऱ्या कसोटी सामन्यात ४३९ धावांची तर शेवटच्या सामन्यात ३५२ धावांची पहिल्या डावात आघाडी घेतली आहे.

या मालिकेत भारताने सलग दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाला फोल्लोव ऑन दिला आहे.