संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने

विश्वचषक 2019 ची स्पर्धा सुरू होण्यासाठी आता फक्त एक वर्ष बाकी आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचे वेध लागले आहेत. इंग्लड आणि वेल्सला होणऱ्या या विश्वचषकाचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे.

हा विश्वचषक 30 मे ते 14 जुलै या कालावधीत होणार आहे.  30 मेला इंग्लड विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात विश्वचषक 2019 चा पहिला सामना होईल.

या स्पर्धेत एकुण 48 सामने होणार असुन 1992 च्या विश्वचषकाप्रमाणेच विश्वचषक 2019 चे स्वरूप असणार आहे. म्हणजेच 10 संघात रंगणाऱ्या या विश्वचषकात प्रत्येक संघ साखळी फेरीत एकमेकांविरूद्ध लढतील आणि यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीत जातील.

पहिला उपांत्य सामना गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघामध्ये होईल, तर दुसरा उपांत्य सामना गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या संघात रंगेल.

इंग्लड आणि वेल्समधील एकूण 11 मैदानांवर हे सामने होणार आहेत. तसेच लॉर्डसच्या मैदानावर या विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. यामुळे लॉर्डसला पाचव्यांदा विश्वचषकाचा अंतिम सामना घेण्याचा मान मिळणार आहे.

असे होतील  भारताचे विश्वचषक 2019 चे सामने:

5 जून- भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका, रोज बॉल, साउथॅंप्टन

9जून- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल, लंडन

13जून- भारत विरूद्ध न्यूझिलंड, ट्रेंटब्रीज, नॉटिंगहॅम

16जून- भारत विरूद्ध पाकिस्तान, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

22जून- भारत विरूद्ध अफगाणिस्तान, रोज बॉल, साउथॅंप्टन

27जून- भारत विरूद्ध विंडिज, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

30जून- भारत विरूद्ध इंग्लड, एजबस्टन, बर्मिंगहॅम

02 जुलै-  भारत विरूद्ध बांग्लादेश, एजबस्टन, बर्मिंगहॅम

06 जुलै-  भारत विरूद्ध श्रीलंका, हेडिंगले, लीड्स

09 जुलै- पहिला उपांत्य सामना, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

11जुलै-  दुसरा उपांत्य सामना, एजबस्टन, बर्मिंगहॅम

14 जुलै –  अंतिम सामना, लॉर्डस

महत्त्वाच्या बातम्या –

-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप 

-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने 

-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची 

-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी 

-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड 

-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला

-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला 

 

-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान