कोहली, रोहित शर्मा आणि जडेजाला आयसीसीकडून खास भेट!

भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांना आयसीसीकडून एक विशेष भेट देण्यात आली आहे. २०१६च्या आयसीसी संघात या तीनही खेळाडूंना स्थान देण्यात आले होते. त्यात संघाची एक प्रतिकात्मक कॅप या तिन्ही खेळाडूंना देण्यात आली आहे.

पुणे येथील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याआधी ही कॅप रोहित शर्मा आणि विराट कोहलीला देण्यात आला. १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या कालावधीत या तीन खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली त्याबद्दल त्यांना आयसीसी संघात स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन विराट आणि रोहितचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघांनीही ती कॅप घातली आहे.

तर दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजाला एक दिवस आधीच ही कॅप मिळाली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी जडेजाचा संघात समावेश केला गेलेला नव्हता. कॅप मिळाल्यानंतर लगेचच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला.

जर तुम्हाला माहित नसेल तर

मागील बारा महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसी अशा प्रकारे पुरस्कृत करते. आयसीसी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आयसीसीच्या या संघाची निवड करते.

दरवर्षी आयसीसीकडून खालील पुरस्कार देण्यात येतात
१. सर गॅरी सोबर्स क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड
२. टेस्ट प्लेअर ऑफ द इयर
३. वनडे प्लेअर ऑफ द इयर
४. टी ट्वेंटी परफॉर्मन्स ऑफ द इयर
५. इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर
६. असोसिएट प्लेअर ऑफ इयर
७. अंपायर ऑफ द इअर
८. कॅप्टन ऑफ द इअर
९. वुमन्स क्रिकेटरऑफ इअर
१०. वुमन्स वनडे क्रिकेटर ऑफ इअर
११.वुमन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर
१२. स्पिरिट ऑफ क्रिकेट
१३. एल जी पीपल्स चॉइस क्रिकेटर ऑफ द ईअर अवॉर्ड
१४. सर्वोत्तम कसोटी संघ
१५. सर्वोत्तम वनडे संघ
१६. महिला संघ

मागील वर्षी आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड आणि टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड भारताच्या रविचंद्रन अश्विनला मिळाला होता. तर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉकला वनडे प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला होता.

विराट कोहलीला आयसीसी टी२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा ही भारतीय खेळाडू या संघात होते. तर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक, एबी डिव्हिलर्स आणि किसको राबाडा या खेळाडूंना या संघात स्थान मिळाले होते. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क व मिचेल मार्श या संघात होते. इंग्लंडकडून जॉस बटलर आणि वेस्ट इंडिज संघाकडून सुनील नारायण या संघात सामील होते. तर दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर १२वा खेळाडू होता.