राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टिंगमध्ये धडाका सुरूच, प्रदिप सिंगचे रौप्यपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत आज पाचव्या दिवशी भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळाले. प्रदिप सिंगने १०५ वजनी गटात ३५२ किलो वजन उचलत रौप्यपदकाची कमाई केली. 

भारताने या स्पर्धेत आजपर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये ६ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदक मिळाले आहेत. 

प्रदिप सिंगने स्नच प्रकारात १५२ तर क्लीन आणि जर्क प्रकारात २०० किलो वजन उचलले. 

भारताचे हे स्पर्धेतील तिसरेरौप्य तर एकूण नववे पदक ठरले. त्यामुळे भारत पदतालिकेत आता पुन्हा चौथ्या स्थानी आला आहे. 

स्नच प्रकारात प्रदिप सिंगनेने पहिल्या प्रयत्नात २०० किलो वजन उचलले परंतु त्याला  दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात अपयश आले.यामुळे

त्याने एकूण ३५२ किलो वजन उचलत भारताला रौप्यपदक मिळवुन दिले.  त्याचे सुवर्ण ८ किलोने हुकले.