भारताच्या अंबाती रायडूची गोलंदाजी ऍक्शन अवैध…

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनीमध्ये पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यातील भारताच्या अंबाती रायडूची गोलंदाजी अवैध(सस्पेक्टेड बॉलिंग ऍक्शन) असल्याचा रिपोर्ट सामना अधिकाऱ्यांनी दिला आहे.

याबद्दलचा रिपोर्ट भारतीय संघाच्या व्यवस्थानपणाकडे सोपवण्यात आले आहेत. यामध्ये रायडूच्या गोलंदाजी कृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे आता रायडूची गोलंदाजीची तपासणी ही आयसीसीच्या कसोटी, वनडे आणि टी20तील अवैध गोलंदाजी संबंधी प्रक्रियेअंतर्गत करण्यात येईल.

त्यासाठी त्याला पुढील 14 दिवसांमध्ये चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. पण या दरम्यान या चाचणीचा निकाल येईपर्यंत रायडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रायडूने या सामन्यात 2 षटके गोलंदाजी केली होती. यात त्याने 13 धावा दिल्या होत्या. तसेच त्याने फलंदाजी करताना त्याला एकही धाव करण्यात अपयश आले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 288 धावसंख्या उभारत भारतासमोर 289 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र भारताला 50 षटकात 254 धावाच करता आल्या. भारताकडून रोहित शर्माने 133 धावांची शतकी खेळी आणि एमएस धोनीने 51 धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली लढत दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा

त्या एका चेंडूमुळे भारताला सिडनी सामना गमवावा लागला…

विश्वचषक गाजवलेल्या खेळाडूला मिळाले न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान