आज भारत आणि वेस्ट इंडीज पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना

वेस्ट इंडीजमधल्या किंग्जस्टन इथं आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाचवा एकदिवसीय क्रिकेट खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत २-१ नं आघाडीवर आहे. चौथ्या सामन्यात भारतीय संघाला वेस्ट इंडिज विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात वेस्ट इंडिजला कमी लेखण्याचा प्रयत्न करणार नाही.

पहिला सामना पाऊसामुळे वाया गेल्यानंतर पुढील दोनही सामन्यात भारताने सफाईदार विजय मिळवले होते. किंग्जस्टन इथं आज भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये होणारा हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. वेस्ट इंडिजला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे.

सध्या भारताचा सलामीवीर अजिंक्य रहाणेने चारही सामन्यात अर्धशतक केली असून भारतीय संघाला खरी चिंता आहे ती युवराज आणि कोहलीच्या फॉर्मची.

हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून किंग्जस्टन येथे सुरु होईल.