पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिस, अटॉस, टीसीएस संघाचे विजय     

पुणे: इन्फोसिस, अटॉस, टीसीएस या संघांनी पुणे आयटी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत संदीप शांघाईच्या शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माºयाच्या जोरावर इन्फोसिस संघाने एम्फसिस संघावर ८२ धावांनी मात केली. इन्फोसिस संघाने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारली.
यात संदीपने ६८ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. यानंतर एम्फसिस संघाला ७ बाद १२४ धावांत रोखण्यात यश मिळवले. दुसº्या लढतीत अटॉस संघाने सनगार्ड संघावर सहा गडी राखून मात केली. सनगार्ड संघाला प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ११३ धावाच करता आल्या. यानंतर अटॉस संघाने विजयी लक्ष्य १७.५ षटकांत ४ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. तिसºया लढतीत टीसीएस संघाने आयरिसर्च संघावर ११ धावांनी विजय मिळवला.
आयरिसर्च संघाने टीसीएस संघाला ९ बाद १४८ धावांत रोखण्यात यश मिळवले होते. मात्र, आयरिसर्चच्या फलंदाजांना चमक दाखविता आली नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिसर्च संघाला १३७ धावाच करता आल्या. त्यांच्या अक्षय खोडेची झुंज एकाकी ठरली.
पूना क्लबवर झालेल्या लढतीत बार्कलेज संघाने बीएनवाय मेलन संघावर दहा गडी राखून सहज मात केली. मेलन संघाला ८ बाद १०९ धावांत रोखल्यानंतर बार्कलेज संघाच्या सलामी जोडीने विजयी लक्ष्य ८ षटकांतच पूर्ण केले. यात दत्तात्रय राऊतीने ३८ चेंडूंत ९ षटकार व ७ चौकारांसह नाबाद ८९ धावांची खेळी केली, तर अभिषेक श्रीवास्तवने नाबाद १० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : १) इन्फोसिस – २० षटकांत २ बाद २०६ (संदीप शांघाइ १०८, प्रभज्योत मल्होत्रा ४२, साईनाथ शिंदे नाबाद ३९, संतोषकुमार सांगळे १-४०, रिझवान खान १-४०) वि. वि. एम्फसिस – २० षटकांत ७ बाद १२४ (रिझवान खान ४३, सागर मिस्कर १६, सागर दुबे ३-२६, थॉमसन शरॉन १-१७).
२) सनगार्ड – २० षटकांत ७ बाद ११३ (कुणाल शहा ३०, प्रणय कानोजे २७, रितेश पुरुशोतमन १-८, हर्षद तिडके १-१४) पराभूत वि. अटॉस – १७.५ षटकांत ४ बाद ११८ (महेश भोसले नाबाद ३३, संदीप भागवत ३२, वैभव पेडणेकर २१, कमलेश रावलानी २-२०, पवन आनंद १-१४, रोहित शेट्टी १-१५).
३) टीसीएस – २० षटकांत ९ बाद १४८ (राहुल गर्ग ४६, गौरव सिंग २४, अभिनव नाबाद २५, अभिषेक सिंग ३-२३, हृषीकेश साळुंके २-१५, गौरव बाबर १-१९) वि. वि. आयरिसर्च – २० षटकांत सर्वबाद १३७ (अक्षय खोडे ५५, संजय खेर २७, अभिनव २-२४, सुनील बाबर २-१७, गौरव भालेराव २-३०).
४) बीएनवाय मेलन – २० षटकांत ८ बाद १०९ (आशिष के. ३४, स्वप्नील जाधव २४, अनूप पेरा २-११, विलक्षण दादवल १-१३, दत्तात्रय राऊती १-७) पराभूत वि. बार्कलेज – ८ षटकांत बिनबाद ११२ (दत्तात्रय राऊती नाबाद ८९, अभिषेक श्रीवास्तव नाबाद १०).