इन्फोसिसने पटकावले पहिल्या पुणेरी पलटण कॉर्पोरेट टेबल टेनिस चॅम्पिअनशिपचे विजेतेपद

पुणे। इंश्योरकोट स्पोर्ट्स प्रा. लि, पुणेरी पलटण कबड्डी टीमचे फ्रँचाईज़ होल्डरने ह्या वर्षी टेबल टेनिसच्या जगात पाहिले पाऊल टाकले. अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये हे पुणेरी पलटण टेबल टेनिस टीमचे पाहिले वर्ष आहे. कॉर्पोरेट कर्मचार्‍यांमधील क्रीडा उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी पुणेरी पलटण टेबल टेनिस कॉर्पोरेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

पुणेरी पलटण टेबल टेनिस कॉर्पोरेट स्पर्धेच्या उद्घाटन आवृत्तीत, इन्फोसिसने एचएसबीसीला अंतिम सामन्यात ३-० ने पराभूत केले. अंतिम सामना २ ऑगस्ट २०१९ रोजी पुण्यातील वेस्टेंड मॉल येथे पार पडला. २७ आणि २८ जुलै रोजी एकम अकॅडेमी, राहटणी, पुणे येथे एलिमिनेटर आयोजित करण्यात आले होते.

येथे २० कॉर्पोरेट संघ सहभागी झाले होते. २० पैकी इन्फोसिस, एम्फसिस लिमिटेड, कॉग्निझंट आणि एचएसबीसी या चार संघांनी उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. वर्ल्ड रँक ५८ सबिन विंटर आणि वर्ल्ड रँक २९५ सेलेना सेल्वकुमार आणि पुणेरी पलटण कबड्डी टीममधील संकेत सावंत, बाळासाहेब जाधव या स्पर्धेला उपस्थित होते. या खेळाडूंव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू अनिकेत कोपारकर देखील अंतिम फेरीसाठी उपस्थित होते. सबिन, सेलेना आणि अनिकेत ह्यांनी टेबल टेनिसचा एक प्रदर्शन सामना खेळला.

यावेळी बोलताना जर्मन टेबल टेनिसपटू सबिन विंटर म्हणाल्या, “आमच्या टीमने हा एक उत्तम उपक्रम आयोजित केला आहे. सर्व खेळाडूंनी ही स्पर्धा खेळण्यासाठी घेतलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या संघाशी संबंधित असल्याचा मला अभिमान वाटतो. टेबल टेनिसचा प्रचार करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. अशा घटना कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना त्यांच्या धकाधकीच्या दैनंदिन कामातून पूर्णपणे जीवंत करतात.”

यावेळी बोलताना इंश्योरकोट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी, कैलाश कांडपाल म्हणाले, “यूटीटी एक सक्षम स्पर्धा आहे ज्याने भारतीय टेबल टेनिसपटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास व्यासपीठ मिळवून दिले आहे. मला आनंद वाटतो की कॉर्पोरेट्स, त्यांच्या कर्मचार्‍यांना अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत जेणेकरून त्यांना स्पर्धात्मक खेळ खेळायला मिळतील आणि त्यांच्या सहकार्यांबरोबर खेळ भावनेचा आनंद लुटता येईल.”

पुणेरी पलटण संघाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्व सहभागी संघांनी कौतुक केले. सर्व खेळाडूंनी यासारख्या अधिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. अल्टिमेट टेबल टेनिसची ही तिसरी आवृत्ती असून पुणेरी पलटण टेबल टेनिस यावर्षी स्पर्धेत शामील झाली आहे. २ जुलै रोजी थ्यागराज स्टेडियम, नवी दिल्ली येथे सुरू झालेली ही स्पर्धा ११ ऑगस्ट २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. या लीगचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी, हॉटस्टार आणि JioTV वर होणार.

पुणेरी पलटण टेबल टेनिस बद्दलः

प्रो कबड्डी लीगनंतर, इंश्योरकोट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने आता अल्टीमेट टेबल टेनिस लीगमध्ये एक संघ मिळवत टेबल टेनिसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पहिल्या हंगामात, पुणेरी पलटण टेबल टेनिस संघात हरमीत देसाई (वर्ल्ड रँक ११२), चुआंग चिह-युआन (वर्ड रँक ३६), रोनित भांजा (वर्ल्ड रँक ३०४), साबिन विंटर (वर्ल्ड रँक ५८), आयहिका मुखर्जी (वर्ल्ड रँक ११२) आणि सेलेना सेल्वकुमार (वर्ल्ड रँक २९५) असे खेळाडू आहेत. ह्या संघाचे मुख्य प्रशिक्षक फ्रान्सिस्को सॅंटोस आणि सहाय्यक प्रशिक्षक पराग अग्रवाल आहेत.

अल्टिमेट टेबल टेनिस बद्दलः
अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) ही भारतातली अशी एक टेबल टेनिसची लीग आहे जी तरूणांना प्रेरणा देते, करमणूक करते आणि चाहत्यांना गुंतवून ठेवते. २०१७ मध्ये सहा फ्रँचायझी आणि ४८ खेळाडूंनी १८ दिवसांत खेळलेल्या यूटीटीने देशातील टेबल टेनिससाठी उच्च स्तर निश्चित केले आहेत.