न्यूजीलँड संघाला मोठा धक्का, सराव सामन्यात हा खेळाडू दुखापतग्रस्त

मुंबई। आज सुरु असलेल्या अध्यक्षीय संघ विरुद्ध न्यूजीलँड सराव सामन्यात न्यूजीलँडचा खेळाडू टॉड अस्टलचा मांडीचा स्नायू दुखावला गेल्यामुळे त्याला मैदान सोडून ड्रेसिंग रूममध्ये परत जावे लागले.

२२ ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध न्यूजीलँड संघात ३ वनडे आणि ३ टी २० सामन्यांची मालिका होणार आहे. त्यासाठीच काही दिवसांपूर्वी अस्टलची न्यूजीलँड संघात निवड झाली होती. तो जर या मालिकेत खेळला असता तर तयाचे हे वनडे पदार्पण ठरणार होते.

अस्टल आज सराव सामन्यात गोलंदाजी करत होता तेव्हा त्याच्या पहिल्या षटकात ३ चेंडू टाकल्यावर त्याचा मांडीचा स्नायू दुखावला गेला. त्यामुळे तो त्याचे षटक पूर्ण करू शकला नाही. त्याच्या ऐवजी न्यूजीलँड कर्णधार केन विलिअमसनने हे षटक पूर्ण केले.

न्यूजीलँड क्रिकेट बोर्डाने सांगितले की अस्टलला देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तो जर लवकर बरा झाला नाही तर टी २० संघात स्थान मिळालेल्या ईश सोधीला वनडे मालिकेतही संधी देण्याची शक्यता आहे. 

अश्स्टेल हा भारत अ विरुद्ध न्यूजीलँड अ संघात याच महिन्यात झालेल्या वनडे मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये होता. भारत अध्यक्षीय संघाने या सामन्यात न्यूजीलँड संघाचा ३० धावांनी पराभव केला.