पुणेरी पलटण नाशिक येथे इंटर-क्लब कबड्डी चॅम्पिअनशीप २५ ऑगस्ट रोजी आयोजित करणार

पुणे। सर्वांपर्यंत युवांचे टॅलेंट पोचावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणेरी पलटणतर्फे महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक आणि पुणे अशा तीन शहरांमध्ये बोल कबड्डी या इंटर-क्लब कबड्डी टुर्नामेंट्सचे आयोजन करण्यात आले आहे.

२५ ऑगस्ट२०१९ रोजी मीनाताई ठाकरे स्टेडियमवर नाशिकचा टप्पा रंगणार आहे आणि १६ संघ चँपियनशिपमध्ये भाग घेतील.

क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी असा हेतू ठेवून फ्रँचायजीतर्फे हे प्रयत्न करण्यात येत आहेत. पुणेरी पलटणने यावर्षी पुण्याबरोबरच औरंगाबाद आणि नाशिक येथील खेळाडूंनाही व्यासपीठ मिळावे म्हणून एक पाऊल पुढे टाकले आहे.

पुणेरी पलटणने आयपीअंतर्गत बोल कबड्डी या कबड्डीच्या टुर्नामेंट्स आयोजित केल्या आहे, या खेळातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून या स्पर्धा भरवण्यात येत आहेत. यंदा बोल कबड्डी अंतर्गत पुणेरी पलटणतर्फे इंटर-क्लब कबड्डी टुर्नामेंट्स महाराष्ट्रातील विविध भागात आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून तब्बल ४५ क्लब सहभागी होणार आहेत. चॅम्पिअनशीपची तिसरी फेरी पुणे येथे ८ सप्टेंबर रोजी शेराटन ग्रँडजवळील,द मिल्स, येथे होईल.

या निमित्ताने इनशुअरकोट स्पोर्टसचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले की, “महाराष्ट्र हे कबड्डीचे माहेरघर आहे आणि या राज्याने भारताला आणि प्रो कबड्डीला खूप श्रेष्ठ खेळाडू दिलेले आहेत. महाराष्ट्रातील आमच्या चाहत्यांशी जोडले जाणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते आणि यंदा आम्ही औरंगाबाद व नाशिक अशा आणखी दोन शहरांमध्ये टुर्नामेंट्सचे आयोजन केलेले आहे. क्लबच्या खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही या स्पर्धांचे आयोजन करतो, भविष्यातही आम्ही असेच अनेक उपक्रम राबवू. या टुर्नामेंट्समधून पुणेरी पलटणला कदाचित नवे खेळाडू प्राप्त होतील.’’

पुणेरी पलटणच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील टॅलेंट असलेले खेळाडू समोर येण्यास मदत होणार आहे. उत्साह आणि अतिशय कष्टाने पुणेरी पलटणने आपला प्रवास सुरू केला आहे, विवो प्रो कबड्डी लीगच्या सातव्या भागात पुणेरी पलटणने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. टीम आपल्या शहरात – पुण्यात १४ सप्टेंबर २०१९ रोजी ते २० सप्टेंबर २०१९ रोजीपर्यंत मॅचेस खेळेल. श्री शिव छत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स महालुंगे, बालेवाडी येथे या स्पर्धा होतील.

इंटर-क्लब कबड्डी चॅम्पिअनशीपमध्ये सहभागी होणारे संघ –
१ क्रिडाप्रबोधनी नाशिक
२ श्री साई स्पोर्ट्स नवीन नाशिक
३ एसपीएच नवीन नाशिक
४ शिखरेवाडी क्रिडा मंडळ नाशिक रोड
५ साई पांडुरली
६ ब्रम्हा स्पोर्ट्स अडगाव
७ शिवशक्ती क्रिडा मंडळ अडगाव
८ कै. उत्तमराव ढिकळे क्रिडा मंडळ सय्यद पिंपरी
९ एलव्हीएच मालेगाव
१० नवचैतन्य क्रीडा मंडळ येवला
११ जयभवानी क्रीडा मंडळ मनमाड
१२ संस्कृतिक क्रिडा मंडळ मनमाड
१३ मनमाड बॉईज मनमाड
१४ सम्राट क्रीडा मंडळ मनमाड
१५ क्रीडाप्रबोधन नासिक रोड
१६ नवीन सिद्धिविनायक क्रीडा मंडल ओझर