राशीद खान विषयी माहित नसलेल्या काही खास गोष्टी

20 सप्टेंबरला म्हणजेच आज अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज राशिद खान हा 20 वर्षाचा झाला आहे. अफगणिस्तानच्या राष्ट्रीय संघात वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी स्थान मिळवणारा सर्वात तरूण  खेळाडू ठरला.

आज आपल्या विसाव्या वाढदिवशी राशिद खान एशिया कप स्पर्धेत बांग्लादेशाविरुध्द सामना खेळत आहे. संघाला विजय मिळवून देण्यात नेहमीच सिंहाचा वाटा उचलणाऱ्या राशिदकडून संघाला आजही अपेक्षा असणार आहेत.

फिरकी गोलंदाज राशिद खान याच्या विषयी जाणून घेऊ थोडक्यात:

-राशिद खानचा जन्म 20 सप्टेंबर 1998 ला अफगाणिस्तानच्या नंगारहार या छोट्याश्या प्रांतात झाला.  

-वयाच्या17 वर्षे आणि 36 दिवसाचा असताना त्याने अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. तेथील उगवत्या क्रिकेटला त्याच्या रूपाने एक तारा मिळाला आहे.

-आपल्या लेग स्पिन गोलंदाजीने फलंदाजांना नाचवणाऱ्या राशिद खानचा गोलंदाजीतील आर्दश आहे पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आणि फलंदाजीतला आदर्श भारताचा कर्णधार विराट कोहली. त्याचा आदर्श असणाऱ्या शाहीद आफ्रिदीने 1996 साली वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली होती.

-अंडर 19 संघाकडून आणि राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी राशिद खानला मिळाली. तो टी-20 विश्वचषक 2016 स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. 2016 साली बांग्लादेशात झालेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत राशिद खान हा साखळी सामन्यांमधील सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने सहा सामन्यात 10 बळी मिळवले होते.

-राशिद खान आयपीएलच्या 10 व्या सत्रात अफगाणिस्तानचा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला.  त्याला 4 कोटी रूपायांची बोली लावत हैद्राबाद संघाने आपल्याकडे घेतले. त्याद्वारे त्याला आपला फलंदाजीतला आदर्श विराट कोहलीच्या विरूध्द गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती.

-आयपीएल मध्ये सनरायर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 31 सामन्यात 21.47 च्या सरासरीने 38 बळी घेतले. फलंदाजांची मक्तेदारी असणाऱ्या या स्पर्धेत राशिद खानने 6.69 ईकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. त्याची आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातील आणि वनडे सामन्यातील ईकॉनॉमी ही अनुक्रमे 6.02 आणि 3.92 आहे.

-राशिद खानला ज्याच्यापासून सतत प्रेरणा मिळायची त्या क्रिकेटच्या देवाला भेटण्याचे स्वप्न तो पाहायचा त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला तो नुसताच भेटला नाही तर त्याच्या सोबत सेल्फी देखील काढण्याचा योग आल्याने तो स्वत:ला भाग्यवान समजतो.

-9 जून 2017 साली वेस्ट इंडीज विरूध्द झालेल्या वनडे सामन्यात राशिद खानने 18 धावात 7 फलंदाजाला बाद केले. असा पराक्रम करणारा चामिंडा वास, शाहीद आफ्रिदी, ग्लेन मॅकग्रा नंतर तो जगातला 4 था गोलंदाज ठरला.   

महत्त्वाच्या बातम्या:
युरोपा लीगसाठी चेल्सीमधून हे मोठे खेळाडू बाहेर

धोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव

फक्त ख्रिस गेल आणि रोहित शर्मानेच असा कारनामा केलायं