आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०हजार धावा केलेल्या खेळाडूचा पुतण्या करतोय कसोटी पर्दापण

पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लड व आर्यलंड कसोटी  दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची निवड करण्यात आली आहे.  या निवडीची खास बाब म्हणजे या संघात पाकिस्तानचा माजी कर्णधार व सध्याचा निवड समितीचा अध्यक्ष इंजमाम उल-हक याचा पुतण्या इमाम उल-हक हा  या दौऱ्यातुन कसोटी क्रिकेटमध्ये पर्दापण  करणार आहे.

पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये लगातर धावा करणाऱ्या फवाद आलमला वगळुन इमाम उल-हकला संधी दिल्याची टिका देखील इंजमाम उल-हकवर होत आहे. 16 जणांच्या या संघात फखार झमान, साद अली व उस्मान सल्लाऊदीन या तरुण खेळाडूंची देखील निवड करण्यात आली आहे.

22 वर्षीय इमाम उल-हक याने आॅक्टोबरमध्ये श्रीलंकेबरोबरच्या वनडे मालिकेत पर्दोपणातच शकत झळकावत संघाला विजय मिळवुन दिला होता.  इमाम उल-हक पर्दोपणातच शकत झळकावणारा पाकिस्तानचा केवळ दुसरा व जगातला तेरावा खेळाडू आहे.

तसेच यासिर शाह व वहाब रियाज या दोन्ही खेळाडूंना दुखापतीमुळे इंग्लड व आर्यलंड दौऱ्यात भाग घेता येणार नाहीये.

इंग्लड व आर्यलंड कसोटी  दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ :

सरफराज अहमद (कर्णधार), अझहर अली, फखार झमान, इमाम उल-हक, समी अस्लम, असद शफिक, बाबर अजाम, हॅरिस सोहेल,  साद अली, उस्मान सल्लाऊदीन, फाहिम अश्रफ, शदाब खान, मौहम्मद अमीर, मौहम्मद अब्बास, हसन अली,  राहत अली