भारतीय आॅलिंपिक संघटनेने दिले सायनाला हे स्पष्टीकरण

२०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्या उद्घाटन सोहळा आहे. तर प्रत्यक्ष स्पर्धेला  5 एप्रिलपासुन सुरूवात होत आहे.

त्याआधीच भारतीय संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय बॉक्सर वर ‘नो निडल पॉलिसी’ चे उल्लंघन केल्याचे आरोप होते. हे  प्रकरण ताजे असतानाच या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या वडिलांना राष्ट्रकुल विलेजमध्ये राहण्यास मनाई केली आहे.

तिचे वडिल हरवीर यांचे नाव २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या अधिकृत यादीतून काढण्यात आले आहे. याचा अर्थ असा कि ते त्या राष्ट्रकुल विलेजमध्ये मध्ये प्रवेश करु शकत नाही. तसेच सायनाचा सामनाही पाहू शकत नाही.

याबाबत सायनाने राष्ट्रकुलच्या अधिकृत ट्विटर हॅंडलला टॅग करत राग व्यक्त केला होता. 

” माझ्या वडिलांचा पाठींबा माझ्यासाठी महत्वाचा आहे. इतर स्पर्धांना ते सदैव माझ्या सोबत असतात. याबद्दल मला साधी कुणी माहितीही दिली नाही. ” असे सायना आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती. 

यावर आज भारतीय आॅलिंपिक संघटनेने ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. “ज्यांच अतिरीक्त अॅक्रेडीयशन आहे त्यांना पैसे भरूनही बेडची किंवा राहण्याची सुविधा पुरवण्यात येत नाही. तशी तरतुद राष्ट्रकुलच्या नियमावलीत करण्यात आली आहे. ” असे या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे.