या दिवशी होणार आयपीएल २०१९ चे संपूर्ण वेळापत्रक घोषित

आयपीएल 2019 च्या स्पर्धेसाठी आता केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे सर्वत्र आयपीएलच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. आयपीएलचा हा 12 वा मोसम 23 मार्चपासून सुरु होत आहे. या मोसमातील पहिल्या 17 सामन्यांचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर झाले आहे.

तसेच संपूर्ण वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या प्रशासकीय समीतीच्या(सीओए) सोमवारी, 18 मार्चला मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. याबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकारीने माहिती दिली आहे.

यावर्षी लोकसभा निवडणूका असल्याने त्याचा विचार करुन आयपीएलचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी जरी निवडणूका असल्या तरी आयपीएल भारतातच खेळवली जाणार आहे.

याबद्दल बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, ‘आयपीएल 2019च्या मोसमाच्या उर्वरित वेळापत्रकाचा सोमवारी सीओएच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल आणि ते घोषित केले जाईल.’

‘आयपीएल सीओओ आणि त्यांची टीम खूप मेहनत करत आहेत. त्यांच्या या कष्टामुळे बीसीसीआय यावर्षी संपूर्ण आयपीएल मोसमाचे आयोजन भारतात करण्यात यशस्वी होत आहे.

यावर्षी आयपीएलमध्ये पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.

याबरोबरच सोमवारी होणाऱ्या या बैठकीत आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहरही उपस्थित राहणार आहेत. ते बीसीसीआय आणि वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (वाडा) यांच्यामधील वादाबद्दलही चर्चा करणार आहेत.

आयसीसीने वाडाच्या नियमांचे पालन करण्याचे ठरविले आहे, पण बीसीसीआय त्या सर्व अटी मानण्यास तयार नाही.

याबद्दल आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले आहे की ‘आम्ही बीसीसीआय आणि वाडा आणि नाडा(नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी) यांच्यातील वाद सोडविण्यासाठी बीसीसीआयची मदत करु. आम्हाला असे वाटते की क्रिकेट 2028 च्या ऑलिंपिकमध्ये असायला हवे. पण जोपर्यंत आपण एकजूट होत नाही तोपर्यंत हे होणार नाही.’

‘आत्ताच्या घडीला आम्ही बीसीसीआयला समजावण्याचा प्रयत्न करु की क्रिकेट ऑलिंपिकमध्ये असणे सर्वच दृष्टीने योग्य आहे.’

असे असले तरी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी बैठकीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की वाडाला वेगळी परिक्षण एजन्सीचे नाव द्यावे लागेल कारण नुकत्याच झालेल्या काही चूकांमुळे नाडावर विश्वास ठवू शकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

टी20 मुंबई लीगमध्ये खेळताना दिसणार अर्जून तेंडुलकर?

ती शर्यत नक्की जिंकणार कोण? रोहित, रैना की धोनी…

अशी आहे विश्वचषक २०१९साठी अनिल कुंबळेची १५ सदस्यीय टीम इंडिया